सांताक्रूज- पणजी येथे पुन्हा गँगवॉर; एक ठार, अनेकांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 01:02 PM2020-06-20T13:02:13+5:302020-06-20T13:05:04+5:30
पोलीसांनी धरपकड सुरू करण्यात आली असून काही गँगस्टर सीसीटीव्ही कॅमºयातही कैद झाले आहेत.
पणजी: सांताक्रूझ - पणजी येथे पहाटे ३ दरम्यान दोन गँगमधील मारामारीत एका गँगमधील माणसाला गोळी लागून तो ठार झाला. पोलीसांनी धरपकड सुरू करण्यात आली असून काही गँगस्टर सीसीटीव्ही कॅमºयातही कैद झाले आहेत.
ही घटना शनिवारी पहाटे ३ ते ३.३० च्या दरम्यान घडली. मेरशे येथे इम्रान बेपारी नामक इसमाच्या घरावर २० ते २५ जणांच्या गटाने अचानक हल्ला केला. त्हल्लेखोर मोटरसायकलीवरून आले होते आणि कोयता तलवारी वगैरे शस्त्रे घेऊन आले होते. यांच्याकडून गोळीबार व दगडफेक सुरू होता. घराबाहेर असलेली कारगाडीही कोयते व दगड घालून मोडतोड करून टाकली. मोडतोडीचा आवाज ऐकून घरातील लोक सावध झाले आणि त्यांनीही उलट हल्ला चढविला. या मारामारीत एकाला गोळी लागली आणि तो मरण पावला. ठार झालेल्याचे नाव सोनू यादव असे असून तो मेरशी भागातील एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि गँगस्टर म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीशी संबंधित आहे.
महतत्वाचे म्हणजे ठार झालेला माणूस हा हल्लेखोरांपैकीच असून त्याला गोळी लागल्यामुळे तो ठार झाला. त्याचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलीस अधीक्षक उत्कृष्ठ प्रसुन यांनी दिली आहे. त्याच्यावर कुणी गोळी झाडली हे अद्याप उघड झालेले नाही. इम्रान बेपारी समर्थकांचे म्हणणे आहे आहे की त्यांनी प्रतिहल्ला चढविताना गोळीबार केला नव्हता. बाटल्या फेकून मारल्या होत्या असे ते म्हणतात. हल्लेखोरांनी वापरलेल्या ब ंदुका या कट्टा पद्धीच्या होत्या, त्यामुळे चुकून बँकफायर होवून स्वत:वरच गोळी झाडली गेल्याचीही शक्यता पोलीस नाकारत नाहीत. या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत अनेकांची धरपकड केली आहे. सांताक्रुज - मेरशी भागात गँगवॉरचा काळा इतिहास असून यापूर्वी ही याठिकाणी अनेक गँगवॉर व खून दरोडे झालेले आहेत.
दरम्यान ज्याच्यावर हल्ला झाला तो इम्रान बेपारी याचाही गुन्हेगारी जगताशी स ंबंध असून त्याच्यावर अनेक गुन्हेही नोंद असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलीस तपास करीत आहेत.