"Sorry, हैप्पी बर्थडे पापा.."; विद्यार्थ्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिले अखेरचे शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 09:49 AM2023-08-04T09:49:53+5:302023-08-04T09:50:24+5:30
मनजोत हा १८ वर्षाचा होता. एप्रिल महिन्यात तो कोटाला पोहचला होता. पोलिसांना त्याच्या सुसाईडची बातमी कळताच ते तात्काळ हॉस्टेलला पोहचले.
राजस्थानच्या कोटा इथं शिक्षण घेणाऱ्या युवकानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. या युवकाने त्याच्या सुसाईड नोटमध्ये जे लिहिलं आहे ते वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. वडिलांना बर्थडे विश करून युवकाने मृत्यूला कवटाळलं. मनजोत सिंह असं या मृत युवकाचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील तो रहिवासी होता. कोटा इथं डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन तो मेडिकलचे शिक्षण घेत होता.
मनजोत हा १८ वर्षाचा होता. एप्रिल महिन्यात तो कोटाला पोहचला होता. पोलिसांना त्याच्या सुसाईडची बातमी कळताच ते तात्काळ हॉस्टेलला पोहचले. रुमचा दरवाजा आतून लॉक होता. विद्यार्थ्याच्या तोंडावर पॉलिथीन बांधलेली, हातही मागून बांधलेले होते. त्यामुळे शिक्षण, खेळणे आणि तणावमुक्त जीवन जगण्याच्या वयाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली असावी असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कोटा इथं आतापर्यंत १९ आत्महत्येचं प्रकरण समोर आलेत. आता मनजोतच्या आत्महत्येबाबत पोलीस तपास सुरू आहे.
हॉस्टेलमध्ये जे फॅन लावलेले असतात त्यात आत स्प्रिंग असते. त्या फॅनवर वजन पडल्यानंतर तो खाली पडतो. कोटामध्ये बहुतांश हॉस्टेलमध्ये असे फॅन आहेत. मनजोत जेव्हा फॅनला सुसाईड करू शकला नाही. तेव्हा त्याने त्याचे डोके, तोंड पॉलिथीननं झाकलं. त्यानंतर गळ्याच्या भोवती चारही बाजूने रस्सी बांधली जेणेकरून हवा आतमध्ये येऊ शकत नाही. रस्सी मागच्या बाजूस बांधली आणि बेडवर झोपी गेला. त्यामुळे त्याला श्वास घेता आला नाही त्यात त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
विद्यार्थ्याच्या खोलीत सुसाईड नोटही आढळली आहे. त्यात विद्यार्थ्याने लिहिलंय की, माझे कुटुंब आणि मित्रांना त्रास देऊ नका. हे मी माझ्या मर्जीने करत आहे. त्याचसोबत त्याने शेवटी हॅप्पी बर्थडे पापा...असंही म्हटलं आहे. मनजोतने ज्यारितीने डोके, तोंड पॉलिथीननं बांधले आहे. त्यामुळे त्याचा मृतदेह कुटुंब आल्याशिवाय पोलिसांनाही हलवता आला नाही. मनजोत नीटची तयारी करत होता अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली.
दरम्यान, मुलांना त्यांच्यासोबत जवळच्या माणसांची गरज असते. मुलांना त्यांचा मित्र बनून समजवण्याची आवश्यकता असते. अयशस्वी ठरल्यानंतर टोमणे मारू नये. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. युवावस्थेत मुलांमध्ये अनेक प्रकारचे मानसिक आणि शारिरीक बदल होत असतात. नवीन हार्मोन तयार होतात. छोट्या वयातील मुलांच्या मानसिकतेवर त्याचा गंभीर परिणाम होतो असं तज्ज्ञ सांगतात.