'स्पेशल-26' स्टाईलने दरोडा; सीबीआय अधिकारी बनून आले अन् 35 लाख लुटून नेले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 07:30 PM2022-08-18T19:30:54+5:302022-08-18T19:31:02+5:30
भरदिवसा एसबीआय बँकेवर हा दरोडा पडला, दरोड्यावेळी बँकेत अनेक ग्राहक होते.
जमशेदपूर: अभिनेता अक्षय कुमारच्या 'स्पेशल-26' चित्रपटात खोटी सीबीआय किंवा आयकर विभागाची टीम बनून चोरी केल्याचे दाखवण्यात आले आहे. तशाच प्रकारची घटना जमशेदपूरमध्ये घडली आहे. येथील बँक ऑफ इंडियामध्ये 'स्पेशल-26' स्टाईलने दरोडा टाकल्याची घटना समोर आहे.
मास्क घातलेल्या चार चोरट्यांनी पिस्तुलाच्या धाकावर बँकेतील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून 35 लाख रुपये लुटले. घटनेच्या वेळी बँकेत डझनभर ग्राहक होते, त्यांचे मोबाईलही चोरट्यांनी हिसकावले. विशेष म्हणजे, सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून दरोडेखोरांनी बनावट धाडीच्या नावाखाली बँक लुटली. ही घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. माहिती मिळताच एसएसपी प्रभात कुमार यांनी तपास केला.
बँकेच्या आत ओलिस ठेवलेल्या ग्राहकांनी सांगितले की, मास्क घातलेल्या दरोडेखोरांनी आधी बँकेत प्रवेश केला आणि ग्राहकांचे मोबाईल घेतले. मोबाईल घेताना त्यांनी सीबीआचा छापा असल्याचे सांगितले. यानंतर दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आणि पिस्तुलचा धाक दाखवत बँकेतून 35 लाख लुटले. जाताना चोरट्यांनी गेटला बाहेरुन कुलूप लावले. नंतर ग्राहकांनी खिडकीतून बाहेर डोकावून आवाज दिला आणि इतरांना बँकेत दरोडा पडल्याचे लोसांगितले. भरदिवसा दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.