सिरियल रेपिस्टच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 07:56 PM2018-10-03T19:56:30+5:302018-10-03T21:12:25+5:30
मीरा रोड येथे राहणाऱ्या रेहमत कुरेशी या विकृताने २०१६ पासून अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता. नवी मुंबई, नालासोपारा आणि ठाण्याचे पोलीस त्याच्या मागावर होते. त्याला नुकतीच मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे, नालासोपारा मधील तुळींज आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
मुंबई - वसईत अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा विकृत सिरियल रेपिस्ट रेहमत कुरेशी याने आतापर्यंत १७ मुलींवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरोधात नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि पालघरमधील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात येणार असून या पथकामार्फत पुढील तपास केला जाणार आहे. यामुळे आरोपी विरोधात भक्कम पुरावे गोळा करणे सोपे होणार आहे.
मीरा रोड येथे राहणाऱ्या रेहमत कुरेशी या विकृताने २०१६ पासून अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत होता. नवी मुंबई, नालासोपारा आणि ठाण्याचे पोलीस त्याच्या मागावर होते. त्याला नुकतीच मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, ठाणे, नालासोपारा मधील तुळींज आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत त्याने १७ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. याशिवाय अनेक मुलींचे त्याने लैंगिक शोषण केले आहे. परंतु, त्या मुलींच्या पालकांनी तक्रारी देण्यास नकार दिली आहे. त्याच्याविरोधात पुरावे गोळा कऱण्याचे काम सुरू आहे. या कामात सुसूत्रता यावी आणि अधिक भक्कम पुरावे गोळा करता यावे यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने १४, २० आणि २१ सप्टेंबर या दिवसात तीन गुन्हे केले होते. त्यापैकी दोन गुन्ह्यातील मुलींनी त्याच्या हातावर तुरी देऊन निसटण्यात यश मिळवले होते. रेहमत कुरेशीवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा (पॉक्सो), विनयभंग आणि अपहरणाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. काही प्रकरणात त्याने मुलींचे अश्लिल छायाचित्रे काढली होती. त्यासाठी त्याचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे.