पोलिसांच्या विशेष पथकानं छापा टाकला अन् वेगळ्याच प्रकारचा अमली पदार्थ सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 09:32 PM2020-07-23T21:32:06+5:302020-07-23T21:50:58+5:30
शहरातील पहिलीच कारवाई; ८ लाखांचा साठा जप्त
नवी मुंबई: पोलिसांच्या विशेष पथकाने कोपरीगाव जवळ छापा टाकून 8 किलो पॉपी स्ट्रॉ या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. पहिल्यांदा हा अमली पदार्थ आढळला असून या प्रकरणी एक आरोपीस अटक केली आहे.
सुनील बलवंता रामबिष्णोई असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. परिमंडळ एकचे उपआयुक्त पंकज डहाणे सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक पेट्रोलिंग करत असताना कोपरीजवळ एक तरूण संशयास्पदपणे फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे 312 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ नावाचा अमली पदार्थ सापडला. त्याला ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता, तिथे 7 किलो 690 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ सापडला. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत 3 लाख 20 हजार आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक जी. डी. देवडे ,अर्चना सतिश करखिले, अशोक हरी ठवळे, संजय आधार ठाकूर, अमित चंद्रकांत वारे, विनायक विठ्ठल गायकवाड, अपर्णा सचिन पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.