UP : सचिवाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, कॅमेऱ्यात कैद झाले आपत्तीजनक दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 09:38 PM2021-08-04T21:38:01+5:302021-08-04T21:38:28+5:30

Special Secretary's pornographic video goes viral : पॉर्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विशेष सचिव शिक्षण आर.व्ही.सिंह यांनी याला षडयंत्र म्हटले आहे.

UP: Special Secretary's pornographic video goes viral, catastrophic scene captured on camera | UP : सचिवाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, कॅमेऱ्यात कैद झाले आपत्तीजनक दृश्य

UP : सचिवाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, कॅमेऱ्यात कैद झाले आपत्तीजनक दृश्य

googlenewsNext
ठळक मुद्दे खरं तर, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात विशेष सचिव शिक्षण आर.व्ही.सिंह सचिवालय कक्षातच महिलेसोबत ऑनलाईन अश्लील कृत्य करताना दिसत आहे.

सोशल मीडियाच्या मदतीने अधिकाऱ्याला अश्लील व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करण्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. यावेळी उत्तर प्रदेश सचिवालय सेवेचे विशेष सचिव दर्जाचे अधिकारी हनी ट्रॅपचे बळी ठरले आहेत. पॉर्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विशेष सचिव शिक्षण आर.व्ही.सिंह यांनी याला षडयंत्र म्हटले आहे.

खरं तर, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात विशेष सचिव शिक्षण आर.व्ही.सिंह सचिवालय कक्षातच महिलेसोबत ऑनलाईन अश्लील कृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेचा विषय बनला. हा व्हिडिओ रितिक शर्मा नावाच्या तरुणाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आयडीवरून आर. व्ही. सिंह यांच्या वॉलवर शेअर करण्यात आला. ते शेअर केल्यानंतर दोघांचेही फेसबुक खाते बंद झाले.

अधिकाऱ्याने षडयंत्र असल्याचे सांगितले
त्याचवेळी, या प्रकरणात अडकलेल्या विशेष सचिवांनी सोमवारी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती, परंतु मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होऊ शकला नाही. आर.व्ही.सिंह म्हणतात की, त्यांच्याविरुद्ध कोणाकडून काही षडयंत्र रचण्यात आले आहे, त्यांना यात गोवण्यात आले आहे. फसवून हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले. यासोबतच त्यांना व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केले जात आहे.

सामाजिक कार्यकर्ता म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट आली
आर. व्ही. सिंह म्हणतात की, काही काळापूर्वी ते सचिवालयात काम करत होते. त्याचवेळी एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून आली. बऱ्याच स्थानिक पत्रकारांचाही संबंधित मुलीच्या प्रोफाईलमध्ये फ्रेण्ड म्हणून सहभाग होता. यामुळे त्या मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर त्या आयडीवरून काही लिंक पाठवण्यात आल्या. त्या लिंकमध्ये जे पाहिले ते पाहून त्यांना धक्काच बसला. या दरम्यान त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आणि नंतर तो व्हायरल झाला.

Web Title: UP: Special Secretary's pornographic video goes viral, catastrophic scene captured on camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.