भरधाव टेम्पाेने दुचाकीचालकाला चिरडले; लातुरमध्ये बार्शी रस्त्यावर ४५ वर्षीय तरुण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 09:31 IST2025-04-06T09:28:12+5:302025-04-06T09:31:35+5:30
तरुणाची मात्र रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती

भरधाव टेम्पाेने दुचाकीचालकाला चिरडले; लातुरमध्ये बार्शी रस्त्यावर ४५ वर्षीय तरुण जागीच ठार
राजकुमार जाेंधळे, लातूर: भरधाव आयशर टेम्पाेन एका दुचाकीचालकाला चिरडल्याची घटना लातुरातील बार्शी रस्त्यावर शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये ४५ वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे. त्याला पाेलिसांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल कले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नाेंद नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील पाच नंबर चाैकातून बारानंबर पाटीकडे भरधाव आयशर टेम्पाे निघाला हाेता. दरम्यान, पाच नंबर चाैकातूनच दुचाकीवरुन ४५ वर्षीय तरुण गावाकडे निघाला हाेता. यावेळी भरधाव टेम्पाेने दुचाकीचालकाला चिरडल्याची घटना घडली. हा अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. घटनास्थळी रस्त्यावरुन ये-जा करणारे वाहनधारकांनी गर्दी केली हाेती. याची माहिती एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस काॅन्स्टेबल दिपक साेनकांबळे यांना मिळाली. त्यांनी दाेन हाेमगार्डना साेबत घेत घटनास्थळी धाव घेतली.
तातडीने एका वाहनातून तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दुचाकीवरील एक महिला जखमी झाल्याची माहिती असून, ही घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले. तरुणाची मात्र रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मात्र अद्याप नाेंद नसल्याचेही त्यांनी सांगितले.