भरधाव डंपरने तिघांना उडवले; दोघांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 04:56 PM2020-02-25T16:56:45+5:302020-02-25T16:59:08+5:30

याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी डंबर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरचालकाला अटक केली आहे.  

Speedy dumper blew up the trio; Both died in accident pda | भरधाव डंपरने तिघांना उडवले; दोघांचा झाला मृत्यू

भरधाव डंपरने तिघांना उडवले; दोघांचा झाला मृत्यू

Next
ठळक मुद्देया प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांना आक्रमक पावित्रा धारण करत रस्ता बंद केला. पायी चालत जाणाऱ्या संजय सखाराम पवार (५९) आणि अज्ञात इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने ना. म. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - लोअर परेल परिसरातील डिलाईल रोड येथे भीषण अपघात घडला आहे. सोमवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास भरधाव डंबरने (एमएच ४३, बीपी ६००१) तिघांना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. डिलाईल रोड येथील बावला मशीदसमोर लोअर परेल मोनोरेल स्टेशन ब्रिज खाली ही घटना घडली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी डंबर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरचालकाला अटक केली आहे.  

या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांना आक्रमक पावित्रा धारण करत रस्ता बंद केला. रात्री 11 नंतर अनेक मोठेमोठे डंपर या रस्त्यावरुन जातात. हे डंपर चालवणारे अनेक ड्रायव्हर हे नशेत असतात असं येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. हा चालक नक्की नशेत होता का? याबाबत पोलीस तपास सुरु आहे. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असून त्यातून तो दारूच्या नशेत होता का ? स्पष्ट होईल. 


चालकाने त्याच्या ताब्यातील डंपर हा हयगयीने व  निष्काळजीपणे चालवून रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या संजय सखाराम पवार (५९) आणि अज्ञात इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने ना. म. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार हे कल्याण येथे राहणारे असून अंदाजे ५० वर्षीय मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. तर तिसऱ्या जखमीवर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

Web Title: Speedy dumper blew up the trio; Both died in accident pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.