थुंकी अंगावर उडाली; डाेंबिवलीत जाब विचारल्याने हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 11:18 AM2022-12-12T11:18:55+5:302022-12-12T11:19:05+5:30

मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Spit flew on the body; Killed for questioning in Dombivli crime news | थुंकी अंगावर उडाली; डाेंबिवलीत जाब विचारल्याने हत्या

थुंकी अंगावर उडाली; डाेंबिवलीत जाब विचारल्याने हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली :  अंगावर थुंकी उडाल्याचा जाब विचारला म्हणून केलेल्या मारहाणीत विजय पटवा या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी कैफ खान (वय १९) तरुणाला अटक केली आहे. त्याला रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरात राहणारे पटवा हे दुपारी दुचाकीवरून चिंचोड्याचा पाडा परिसरातून जात होते. त्याच वेळेस रस्त्यावरून पायी चालत जात असलेला कैफ हा रस्त्यावर थुंकला. या दरम्यान मागून दुचाकीने येणाऱ्या पटवा यांच्या अंगावर थुंकी उडाली. त्याचा जाब पटवा यांनी कैफला विचारला. याचा कैफला राग आला आणि त्याने पटवा यांना शिवीगाळ करून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पटवाही संतापले. दोघांत सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. कैफने विजय पटवा यांना लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पटवा हे रस्त्यावर खाली कोसळले. त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण 
n कैफने विजय पटवा यांना लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पटवा हे रस्त्यावर खाली कोसळले.
n विजय पटवा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागेवरच बेशुद्ध पडले. त्यांना आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. 
n मात्र, तत्पूर्वीच विजय पटवा यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

Web Title: Spit flew on the body; Killed for questioning in Dombivli crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.