नात्याला काळिमा! भावाने धाकट्या बहिणीवर 3 वर्ष केला बलात्कार, आता सतावतेय ही भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 09:06 PM2020-05-27T21:06:03+5:302020-05-27T21:08:14+5:30

जालंधर येथील एक निरागस मुलगी केवळ 11 वर्षांची असताना तिच्या थोरल्या भावाच्या लैंगिक छळाला बळी पडली.

Spot on the relationship! The brother raped the younger sister, now the fear of persecution PDA | नात्याला काळिमा! भावाने धाकट्या बहिणीवर 3 वर्ष केला बलात्कार, आता सतावतेय ही भीती

नात्याला काळिमा! भावाने धाकट्या बहिणीवर 3 वर्ष केला बलात्कार, आता सतावतेय ही भीती

googlenewsNext
ठळक मुद्दे दिवसभर ती निरागस मुलगी घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात लपून बसून दुखी झाली आणि तिला भीती वाटू लागली की, तिचा भाऊ परदेशातून परत येताच पुन्हा एकदा  बलात्कार करण्यास सुरूवात होईल.मुलीला सोमवारपासून पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते, कायद्याने तिला त्वरित चाईल्ड केअरकडे पाठवणे बंधनकारक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मुलाला पोलिस ठाण्यात नेले जाऊ शकत नाही.

जालंधरमधून एक धक्कादायक प्रकरण पुन्हा समोर आले आहे, या घटनेने पुन्हा एकदा सख्ख्या नात्याला काळिमा फासले आहे. क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत असताना एका भावाने आपल्या बहिणीवर बरीच वर्षे  ९ वर्षीय धाकट्या बहिणीवर बलात्कार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जालंधर येथील एक निरागस मुलगी केवळ 11 वर्षांची असताना तिच्या थोरल्या भावाच्या लैंगिक छळाला बळी पडली. सध्या पीडित मुलगी साधारण 16 वर्षाची असून तिचा भाऊ सध्या मलेशियात राहत आहे. जेव्हा तिचा भाऊ मलेशियात 2 वर्षे वास्तव्य करीत होता तेव्हा त्या निरागस मुलीने आपल्याला सुरक्षित असल्याने घरी काही काळ घालविला होता, परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा तिला समजले की तिचा भाऊ मलेशियाहून भारतात परत येत आहे, हे कळताच पुन्हा एकदा बहिणीची चिंता वाढली आणि रात्रीची झोप सुद्धा उडाली.

कसाबला फासापर्यंत पोहोचवणाऱ्या साक्षीदाराची मृत्यूशी झुंज अपयशी, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

 

Coronavirus : मुंबई पोलीस दलातील तेरावा बळी, आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

 

दिवसभर ती निरागस मुलगी घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात लपून बसून दुखी झाली आणि तिला भीती वाटू लागली की, तिचा भाऊ परदेशातून परत येताच पुन्हा एकदा  बलात्कार करण्यास सुरूवात होईल. त्याच परिस्थितीत पीडित बहिणीच्या मनात घबराट झाला आणि तिने १६ मे रोजी चंदीगडच्या वकिलाकडे जाऊन आपली वेदनादायक कहाणी सांगितली.

वकीलाच्या मदतीने हे प्रकरण राज्य बाल आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे २५ मे रोजी राज्य बाल आयोगाकडून त्यांना माहिती मिळाली की, या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे आणि मुलीलाही रेस्क्यू करून चाईल्ड केअरकडे पाठविण्यात आले आहे. पण जेव्हा मंगळवारी ती जालंधरला पोहोचली तेव्हा ती हैराण झाली. कारण पोलिस प्रशासनाकडून ना एफआयआर नोंदविण्यात आला नव्हता ना तोपर्यंत मुलाला चाईल्ड केअर करण्यासाठी पाठवले गेले नाही. वकील पुढे म्हणाले की, नियमांनुसार अशा घटनांमध्ये जेव्हा कोणत्याही मुलीची बचाव कारवाई केली जाते, तेव्हा पोलिस कर्मचारी साध्या गणवेशात जातात, परंतु या प्रकरणात वर्दी परिधान केलेली महिला पोलिस कर्मचारी मुलीच्या घरी पोहचली आणि नंतर तिला तिच्या अ‍ॅक्टिव्ह्यावर बसवून पोलिस ठाण्यात नेले. मुलीला सोमवारपासून पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते, कायद्याने तिला त्वरित चाईल्ड केअरकडे पाठवणे बंधनकारक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मुलाला पोलिस ठाण्यात नेले जाऊ शकत नाही.

जालंधरच्या सदर पोलिस ठाण्यात भावाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याकडे दुर्लक्ष करून पोलिसांनी वर्दीतील महिला पोलिस कर्मचाऱ्याला मुलीच्या घरी पाठवले आणि तिला पोलिस ठाण्यात आणले. महिला पोलिस कर्मचाऱ्याने त्या मुलीला आपल्या अ‍ॅक्टिव्हावरून आणले आणि मुलाला कमिशन पाठवण्याऐवजी तिला तिथेच ठेवले होते, याबाबत पोलिस उत्तर देऊ शकले नाहीत.

Web Title: Spot on the relationship! The brother raped the younger sister, now the fear of persecution PDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.