अस्तनितले साप! भारतीय सैन्यात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 04:51 PM2020-06-10T16:51:18+5:302020-06-10T16:54:57+5:30

सोमवारी दोघांना अटक करून जयपूर येथे आणण्यात आले.

Spying for Pakistan while working in Indian Army, both arrested | अस्तनितले साप! भारतीय सैन्यात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी, दोघांना अटक

अस्तनितले साप! भारतीय सैन्यात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी, दोघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे हे दोन्ही संशयित भारतीय लष्कराविषयी गोपनीय माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला देत असत.चिमणलाल नायक हा बीकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होताविकास तिलोतिया गंगानगर येथील फील्ड दारूगोळा डेपोमध्ये व्यापारी होता असे सांगितले.

राजस्थानमध्ये हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना जयपूरच्या कोर्टाने मंगळवारी 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी चिमणलाल नायक हा बीकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता आणि विकास तिलोतिया गंगानगर येथील फील्ड दारूगोळा डेपोमध्ये व्यापारी होता असे सांगितले. सोमवारी दोघांना अटक करून जयपूर येथे आणण्यात आले.

अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुप्तचर विभाग) उमेश मिश्रा यांनी सांगितले की, त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता तेथे दंडाधिकाऱ्यांनी त्याला १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जयपूरमधील केंद्रीय तपास यंत्रणेकडून दोघांची चौकशी केली जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी माहिती दिली होती की, हे दोन्ही संशयित भारतीय लष्कराविषयी गोपनीय माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला देत असत.

 

खळबळजनक! मुलीचे अपहरण करून महसूल कर्मचाऱ्यासह दोघांनी चालत्या कारमध्ये केला बलात्कार

 

खाकीला काळिमा! फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक

 

गुड न्यूज! राज्यात ४८ तासात एकही पोलीस कोरोनाबाधित आढळला नाही 

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! व्हॉट्स अ‍ॅपवरून मुली पुरवायचे; म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

Web Title: Spying for Pakistan while working in Indian Army, both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.