श्रीलंकेतील हत्येच्या आरोपीला मीरा रोडमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:44 IST2025-01-16T10:44:04+5:302025-01-16T10:44:14+5:30
जामिनावर सुटल्यावर टोनी नावाच्या मित्राच्या मदतीने तो डिसेंबरमध्ये भारतात आला.

श्रीलंकेतील हत्येच्या आरोपीला मीरा रोडमधून अटक
मीरा रोड : काशीगाव पोलिसांनी बनावट आधार कार्ड बनवून राहणाऱ्या श्रीलंकन नागरिकास पकडले आहे. श्रीलंकेत हत्या करून तो भारतात पळून आला आहे.
काशीगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या निर्देशानुसार पोलिस ठाणे हद्दीतील लॉजिंगची अचानक जाऊन तपासणी केली जात आहे. महामार्गावरील वेस्टर्न हॉटेलमध्ये पोलिस उपनिरीक्षक अभिजित लांडे व पथकाने १३ जानेवारीच्या रात्री तपासणी केली असता तेथे अरुमाहद्दी जनिथ मदुसंघा डिसिल्वा (वय ३६) हा श्रीलंकन नागरिक आढळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने श्रीलंकेत कौटुंबिक वादातून २०१५ साली एका बड्या व्यक्तीची हत्या केल्याचे समोर आले. त्या हत्येप्रकरणी सुमारे ७ वर्षे तेथील कारागृहात बंदी होता. १३ डिसेंबर रोजी तो जामिनावर सुटल्यानंतर समुद्र मार्गाने रामेश्वरम येथे उतरला. तेथून त्याने मुंबई गाठली.
जामिनावर सुटल्यावर टोनी नावाच्या मित्राच्या मदतीने तो डिसेंबरमध्ये भारतात आला. त्याच्यासाठी बनावट आधार कार्ड, सिम कार्ड व मोबाइल याची व्यवस्था नालासोपारा येथून केली गेल्याचे सूत्रांनी सांगितले.