SSR Case : पोस्टमॉर्टेमच्या इतक्या तासआधी झाला होता सुशांतचा मृत्यू, अहवालातून झाला खुलासा

By पूनम अपराज | Published: October 5, 2020 10:02 PM2020-10-05T22:02:58+5:302020-10-05T22:06:23+5:30

Sushant Singh Rajput Case : सुशांतचा पोस्टमॉर्टेमपूर्वी सुमारे 10 ते 12 तास आधी मृत्यू झाला होता, असे तपासात समोर आले आहे. सुशांतचे पोस्टमॉर्टेम करणाऱ्या कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही वस्तुस्थिती उघड केली आहे.

SSR Case: Sushant dies just hours before postmortem, report reveals | SSR Case : पोस्टमॉर्टेमच्या इतक्या तासआधी झाला होता सुशांतचा मृत्यू, अहवालातून झाला खुलासा

SSR Case : पोस्टमॉर्टेमच्या इतक्या तासआधी झाला होता सुशांतचा मृत्यू, अहवालातून झाला खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्दे27 जुलै रोजी मुंबई पोलिसांना कुर्ताच्या संदर्भात एक फॉरेन्सिक अहवालही प्राप्त झाला होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्टवरून जे प्रश्न उपस्थित झाले होते त्याला फॉरेन्सिक तज्ञांच्या अहवालानंतर उत्तर पुढे आली आहेत. सुशांतचा पोस्टमॉर्टेमपूर्वी सुमारे 10 ते 12 तास आधी मृत्यू झाला होता, असे तपासात समोर आले आहे. सुशांतचे पोस्टमॉर्टेम करणाऱ्या कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही वस्तुस्थिती उघड केली आहे.

खरंतर सुशांतच्या पोस्टमॉर्टेमचा सर्वात मोठा प्रश्न असा होता की, त्याच्या पोस्टमॉर्टम अहवालात वेळ का नव्हता? तर सुशांतचे पोस्टमार्टम करणार्‍या मुंबईतील कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांना प्रश्न मुंबईपोलिसांनी विचारले. डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली की सुशांतचा पोस्टमॉर्टेम होण्याच्या 10 ते 12 तासापूर्वी मृत्यू झाला होता आणि रुग्णालयाच्या नोंदीनुसार 14 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले होते.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एम्स डॉक्टरांच्या एका पॅनेलने हत्या नाही झाली तर हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सीबीआयला सांगितले आहे. यावर रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली होती. ते म्हणाले होते की, मी सीबीआयच्या अधिकृत वक्तव्याची वाट बघतो आहे, या सत्याला बदलू नाही शकतं.  

सुशांतच्या पोस्टमॉर्टमबद्दल एक प्रश्न असा होता की, पोस्टमॉर्टममध्ये मृत्यूची वेळ न लिहिण्यामागे कट रचल्यासारखे काहीही नव्हते आणि एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकानेही अशा प्रकारच्या प्रश्नांवर मुंबईतील कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी केली. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब आपल्या तपास अहवालाचा भाग बनविला असून ती सर्वोच्च न्यायालयातही सादर केली गेली आहे.

 

खळबळ!  हाजी अली पोलीस चौकीमागे समुद्रकिनारी आढळला एका महिलेचा मृतदेह


27 जुलै रोजी मुंबई पोलिसांना कुर्ताच्या संदर्भात एक फॉरेन्सिक अहवालही प्राप्त झाला होता. ज्यामध्ये कुर्ताच्या टेंसिल स्ट्रेंथ तपासली गेली. याचा अर्थ असा होतो की, सुशांतला ज्या कुर्त्याला लटकलेला आढळला होता, सुशांतचे वजन पेलण्याइतके त्या कुर्त्याची क्षमता आहे की नाही. अहवालानुसार, कुर्ता सहजपणे 200 किलोपर्यंत वजन पेलू शकतो, तर सुशांतचे वजन त्याच्या निम्म्याहूनही कमी आहे. यासह कुर्ताच्या फायबरची तपासणीही केली गेली आणि सुशांतच्या गळ्यातील हाच फायबरही सापडला, ज्याने सिद्ध केले की, आत्महत्या त्याच कुर्त्याने गळफास लावून झाली आहे.

Web Title: SSR Case: Sushant dies just hours before postmortem, report reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.