लातूर हादरले! उदगीर आगारात एसटीमध्येच बस चालकाने लावून घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 11:06 PM2021-10-05T23:06:20+5:302021-10-05T23:06:20+5:30
गेल्या महिन्यातच संगमनेरमध्ये बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला होता. पंधरा दिवसांत दुसऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगीर : येथील बस आगारात चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण मात्र समोर आले नाही.
संजय रामराव केसगिरे (४७) यांनी आगारातील बसमध्ये (एम.एच. २० बी.एल. २१६०) गळफास घेतल्याचे आढळून आले. उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गेल्या महिन्यातच संगमनेरमध्ये बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला होता. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीवरून समोर आले होते. त्या आधी गेल्या वर्षी कंडक्टरने आत्महत्या केली होती. तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्यामुळे या परिस्थितीला ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे चिठ्ठीत म्हणत जळगावमध्ये कंडक्टरने आत्महत्या केली होती.