राज्यात ५७ गुन्हे करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 08:36 PM2018-12-05T20:36:03+5:302018-12-05T20:36:29+5:30

जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये ५७ गुन्हे दाखल असलेला निशांत उर्फ राहुल प्रवीण परमार (मूळ रा. उपळी, जि. बीड, सध्या दहिसर मुंबई) हा ठकसेन रत्नागिरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

In the state, 57 criminals who have been arrested by the Intelligence Police | राज्यात ५७ गुन्हे करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

राज्यात ५७ गुन्हे करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

Next

रत्नागिरी - पोलीस अधिकारी बोलत असल्याची खोटी बतावणी करून लोकांना लुबाडणारा मुंबई तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये ५७ गुन्हे दाखल असलेला निशांत उर्फ राहुल प्रवीण परमार (मूळ रा. उपळी, जि. बीड, सध्या दहिसर मुंबई) हा ठकसेन रत्नागिरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.

सात जिल्ह्यातील पोलिसांना वाॅन्टेड असलेल्या या ठकसेनाला अटक करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी जाळे विणले आणि त्यात तो सापडला.  पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे,  यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. रत्नागिरीतील उद्योजक दीपक गद्रे यांच्याकडे या ठकसेनाने २० लाखांची मागणी केली होती. त्यावरुन पोलिसांनी त्याचा माग काढला.

Web Title: In the state, 57 criminals who have been arrested by the Intelligence Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.