येऊर, घोडबंदर रोडवरील डझनभर अवैध धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; बारा जणांना अटक 

By अजित मांडके | Published: December 19, 2022 05:14 PM2022-12-19T17:14:04+5:302022-12-19T17:15:11+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आगामी नाताळ व नवर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे.

State Excise Department raids dozens of illegal dhabas on Ghodbunder Road | येऊर, घोडबंदर रोडवरील डझनभर अवैध धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; बारा जणांना अटक 

येऊर, घोडबंदर रोडवरील डझनभर अवैध धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; बारा जणांना अटक 

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील निर्सग रम्य असलेल्या येऊर व घोडबंदर येथे शनिवार - रविवारी अशा सलग दोन दिवस अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या १२ धाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने धडक कारवाई केली. या कारवाई त्या धाब्यांवरील १२ (मॅनेजर) जणांना अटक करत, अंदाजे २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आगामी नाताळ व नवर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. नागरीकांनी कुठल्याही प्रकारच्या कमी किंमतीच्या व बनावट मद्याच्या आहारी जावू नये, असे मद्य आपल्या शरीरास अपायकारक ठरु शकते. त्यामुळे शासनमान्य दुकानातून मद्य खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी अनधिकृत धाब्याचे समुळ उच्चाटन करण्याकामी इतर विभागाशी संपर्क साधून धाबे व अवैध मद्य विक्रीवर संयुक्तरित्या कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे अधीक्षक निलेश सांगड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील येऊर आणि घोडबंदर रोडवर अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या धाब्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार  १२ धब्यांच्या अटक करत २१ हजार ९३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क बी विभागाचे निरीक्षक शिवशंकर पाटील व दुय्यम निरीक्षक सलीम शेख, मनोज संबोधी व जवान संदिप पाटील, राजेशकुमार तारु व इतर कर्मचाऱ्यांनी केली. 

गतवर्षाच्या तुलनेत २५.३८ कोटींचा जास्त महसूल जमा - 
ठाणे जिल्हयामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एकूण १ हजार ९७६ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये १ हजार २४८ वारस व ७२५ बेवारस गुन्हयांचा समावेश आहे. तर या कारवाईमध्ये १ हजार ३२७ जणांना अटक केली. याशिवाय ८८ वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच एकूण ७.५० कोटी रुपयांचा मुद्देमाल केला आहे. याच कालावधीत एकूण १३१.०८ कोटी रुपयांचा महसूल शासनास प्राप्त करुन दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २५.३८ कोटी रुपये जास्त महसूल जमा करुन देण्यात विभागाला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

"येऊर आणि घोडबंदर रोडवरील १२ धाब्यांवर शनिवार- रविवारी कारवाई करण्यात आली. यामध्ये १२ जणांना अटक केली. ते त्या धाब्यांवरील मॅनेजर असून ही कारवाई यापुढे अशी सुरू राहणार आहे. "- नीलेश सांगड, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ,ठाणे विभाग.
 

Web Title: State Excise Department raids dozens of illegal dhabas on Ghodbunder Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.