सांगलीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

By शरद जाधव | Published: July 29, 2023 09:08 PM2023-07-29T21:08:43+5:302023-07-29T21:09:05+5:30

LCB ची कारवाई, तीन लाखांचा ऐवज जप्त

Staunch burglar who burglarized houses in Sangli was arrested by the Crime Investigation Branch | सांगलीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

सांगलीत घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

googlenewsNext

शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शहरासह कुपवाड परिसरात घर फोडून ऐवज लंपास करणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. राकेश शिवलिंग हदीमणी (वय २४, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून १४ हजार रुपयांच्या रोकडसह तीन लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करून कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कार्यरत आहे. या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार धामणी रोडवरील शांतीबन चौक परिसरात छापा मारून हदीमणी यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीमध्ये १४ हजार रुपयांची रोकड, चार तोळे ६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने तर १२५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने मिळून आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत विश्रामबाग पोलिस ठाणे, कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्यावेळी घरफोडी करून ऐवज लंपास केल्याचे सांगितले.

हदीमणी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, कुमार पाटील, बिरोबा नरळे, सुनिल जाधव आदींसह पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Staunch burglar who burglarized houses in Sangli was arrested by the Crime Investigation Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.