‘The Fast & Furious’ स्टाइलमध्ये करत होते चोरी, एका महिन्यात लंपास केल्या ४० लक्झरी कार्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 01:51 PM2022-05-28T13:51:14+5:302022-05-28T13:51:54+5:30
Delhi Crime: पोलीस उपायुक्त मनोज सी म्हणाले की, आरोपी हॉलिवूड सिनेमा 'द फास्ट अॅन्ड फ्युरिअस' ने प्रेरित होते आणि त्यांनी काही मिनिटांमध्ये कार अनलॉक करण्यासाठी स्कॅनरचा वापर केला.
Delhi Crime: हॉलिवूड सिनेमाची सीरीज 'द फास्ट अॅन्ड फ्युरिअस' ने प्रेरित होऊन तीन लोकांनी दिल्ली-एनसीआरमधून ४० लक्झरी कारची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ४० लक्झरी कार्स गेल्या महिन्यात चोरी झाल्या. या गाड्या चोरी करण्यासाठी त्यांनी जीपीएस जॅमर, स्कॅनर आणि रिमोट कंट्रोल कार्ससहीत अनेक गॅजेट्सचा वापर केला. चोरी केल्यानंतर गाड्या जास्त किंमतीत विकल्या जात होत्या. पोलिसांनी सांगितलं की, टोळीतील एक उत्तर प्रदेशच्या मेरठचा राहणारा आहे. जो रवि उत्तम नगर गॅंगचा सदस्य आहे.
पोलीस उपायुक्त मनोज सी म्हणाले की, आरोपी हॉलिवूड सिनेमा 'द फास्ट अॅन्ड फ्युरिअस' ने प्रेरित होते आणि त्यांनी काही मिनिटांमध्ये कार अनलॉक करण्यासाठी स्कॅनरचा वापर केला आणि नंतर कारमधील जीपीएस निष्क्रिय करण्यासाठी जॅमरचा वापर केला. पोलिसांना आरोपींकडे दोन पिस्तुलसोबतच सेंसर किट, चुंबक, एलएनटी चाव्या आणि आठ रिमोट कारच्या चाव्या सापडल्या.
डीसीपी म्हणाले की, आरोपींनी खुलासा केला की, एक सॉफ्टवेअर हॅकिंग डिवाइसचा वापर करून त्यांनी आधी कार अनलॉक केल्या. त्यानंतर कारचं सॉफ्टवेअ फॉर्मॅट करून डिवाइसच्या मदतीने नवीन सॉफ्टवेअर टाकलं.
नवीन चाव्या तयार केल्या आणि त्यांनी दोन ते तीन मिनिटांमध्ये कार चोरी केली. डीसीपी पुढे म्हणाले की, कार चोरी केल्यावर चोर त्या सोसायटी, हॉस्पिटल आणि अशा ठिकाणी पार्क करत होते जिथे सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत. मग चोरी केलेल्या या कार आरोपी राजस्थान आणि मेरठला जास्त किंमतीत विकत होते.
आरोपींमध्ये ४२ वर्षीय मनीष राव, ४३ वर्षीय जगदीप शर्मा आणि ४० वर्षीय आस मोहम्मद यांचा समावेश आहे. राव आणि शर्मा दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये राहणारे आहेत. तेच मोहम्मद मेरठचा आहे. पोलिसांनी राव आणि शर्माला तेव्हा पकडलं जेव्हा ते एका भागात चोरी केलेल्या कारचं डील करत होते. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी एप्रिलपासून उत्तम नगर, तिलक नगर, सुभाष नगर, पश्चिम विहार,मुनिरका आणि द्वारका येथून ४० कार्सची चोरी केली.