शाळेचे गेट चोरून नेत होते, शिकारीसाठी लावलेल्या इलेक्ट्रीक करंटमुळे दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 01:21 PM2022-11-06T13:21:29+5:302022-11-06T13:21:54+5:30

परसटोला पहाडीच्या जंगलात शिकारीसाठी लावलेला करंट लागून  दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

Stealing school gate, two killed by electric current in Deori Crime news | शाळेचे गेट चोरून नेत होते, शिकारीसाठी लावलेल्या इलेक्ट्रीक करंटमुळे दोघांचा मृत्यू

शाळेचे गेट चोरून नेत होते, शिकारीसाठी लावलेल्या इलेक्ट्रीक करंटमुळे दोघांचा मृत्यू

googlenewsNext

-  विलास शिंदे      
 देवरी - बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळेची गेट रात्रीच्या अंधारात चोरुन नेत असताना परसटोला पहाडीच्या जंगलात शिकारीसाठी लावलेला करंट लागून  दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री 11.30 वाजताच्या  सुमारास देवरी शहराजवळच्या परसटोला पहाडीजवळ ही घटना घडली.  

या घटनेत अनमोल नंदलाल गायकवाड़ (22 वर्ष) व आशीष मुन्ना कोसरे (28) दोन्ही राहणार परसटोला प्रभाग 16 यांचा मृत्यु झाला असून सोबत असणारे तिघे थोडक्यात बचावले. प्राप्त माहितीनुसार मृतक अनमोल गायकवाड़ व आशीष कोसरे त्यांचे तीन मित्र मनोहर कुंजाम, बबलू माहुरकर, श्याम भारती या  पाच ही मित्रांनी एम.आय.डी. सी. परिसरात बंद अवस्थेत असलेल्या जिल्हा परिषद शाळेची गेट लोखंडी आरिने कापली. लोखंडी गेट चोरुन नेत असताना परसटोला पहाडीजवळ अज्ञात इसमाद्वारे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या  इलेक्ट्रीक करंटच्या तारांना स्पर्श झाला.

यानंतर अनमोल गायकवाड़ व आशीष कोसरे हे दोघे खाली पडले. त्यांच्या मागे असणाऱ्या तिघा मित्रांनी त्यांना ओढून तारेपासून बाजूला केले. यानंतर गावात येत घटनेची माहिती दिली. गावकऱ्याच्या मदतीने त्या दोघांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. फिर्यादी मनोहर रूपसिंग कुंजाम यांच्या तोंडी रिपार्टवरून देवरी पोलिसांनी  दोन्ही मृतकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे रेवचंद सिंगनजुड़े यांच्या मार्गदर्शनाखाली सब इन्स्पेक्टर आनंदराव घाडगे हे घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: Stealing school gate, two killed by electric current in Deori Crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.