भयंकर! सावत्र आई असलेल्या मावशीचे लहानग्यावर अमानुष अत्याचार; चटके दिल्यानं चिमुरडा भाजला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 02:35 PM2021-06-08T14:35:45+5:302021-06-08T14:42:11+5:30

नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू; दिंडोरी पोलिसांकडून कारवाई सुरू

stepmother tortures minor boy in very Inhuman way in nashik | भयंकर! सावत्र आई असलेल्या मावशीचे लहानग्यावर अमानुष अत्याचार; चटके दिल्यानं चिमुरडा भाजला

भयंकर! सावत्र आई असलेल्या मावशीचे लहानग्यावर अमानुष अत्याचार; चटके दिल्यानं चिमुरडा भाजला

googlenewsNext

दिंडोरी (नाशिक) : माय मेली तरी मावशी जगावी अशी म्हण आहे  पण आई व मावशी या दोन्ही नात्यांना काळिमा फासणारी घटना दिंडोरी तालुक्यातील पाडे येथे घडली असून मूकबधिर मुलाला सावत्र आई असलेल्या मावशीने अंगावर चटके देत अमानुष अत्याचार केल्याची घटना व्हिडीओ व्हायरल झाल्याने उघडकीस आला आहे. सदर बालकावर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की पाडे येथील तीन वर्षीय मतिमंद बालकास त्याची सावत्र आईने अमानुषपणे मारहाण केली.  अनेक ठिकाणी चटके देत अत्याचार केले.ही घटना काही नागरिकांना समजताच त्यांनी त्यास दिंडोरी येथे उपचारासाठी नेले तेथे उपचार करून पुढे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले .सदर सावत्र आई ही त्या बाळाची मावशी आहे.कौटुंबिक कलहातून सोडून गेलेल्या आईनंतर सावत्र आई ही मावशी असल्याने तिची माया मिळेल ही आशा फोल ठरत नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने संताप व्यक्त होत आहे दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली असून पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कलपेशकुमार चव्हाण करत आहे.

सावत्र आईने आरोप फेटाळला
या घटनेनंतर सावत्र आईच मुलाला घेऊन रुग्णालयात आली. मुलाला चटके दिल्याचा आरोप तिने फेटाळला आहे. हा लहानगा आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये भांडण झालं. त्यातून ही घटना घडली आहे, असं दावा तिने एबीपी माझाशी बोलताना केला आहे.

Web Title: stepmother tortures minor boy in very Inhuman way in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.