बसपाच्या तिकीटावर विधानसभा लढविलेली, कुख्यात गँगस्टरचा एसटीएफने केला एन्काऊंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:56 AM2024-01-05T10:56:28+5:302024-01-05T10:56:53+5:30
उपाध्याय हा टोळी बनवून गोरखपूर, बस्ती, संतकबीर नगर, लखनऊमध्ये हत्या करत होता. सुपारी घेऊन तो हे काम करायचा.
उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूरमध्ये एसटीएफने माफिया विनोद कुमार उपाध्यायला यमसदनी धाडले आहे. बसपाच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या या शार्प शुटरचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. गोरखपूर पोलिसांनी उपाध्यायवर एक लाखाचे बक्षीस लावले होते. त्याने २००७ मध्ये निवडणूक लढविली होती, यात पराभूत झाला होता.
उपाध्याय हा टोळी बनवून गोरखपूर, बस्ती, संतकबीर नगर, लखनऊमध्ये हत्या करत होता. सुपारी घेऊन तो हे काम करायचा. एसटीएफ मुख्यालयातील उप अधीक्षक दीपक कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली त्याचे एन्काऊंटर करण्यात आले.
विनोद उपाध्याय यांच्यावर गोरखपूर, बस्ती आणि संत कबीर नगरमध्ये ३५ गुन्हे दाखल आहेत, पण त्यांना एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नव्हती. शुक्रवारी पहाटे एसटीएफच्या पथकाने त्याला घेरले असता त्याने पळून जाण्यासाठी गोळीबार सुरू केला. त्यानंतर एसटीएफने त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळ्या घातल्या. गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला.
उपाध्याय हा आधी साधा गुन्हेगार होता. परंतु त्याला एकाने कानाखाली मारले होते, तेव्हा उपाध्यायने त्याची हत्या केली होती. यानंतर उपाध्यायचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाले होता. २००४ मध्ये गोरखपूर तुरुंगात असताना जीतनारायण मिश्रा या कैद्याने त्याला थप्पड मारली होती.