नात्याला कलंक! आजोबाने केले नातीचे लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 05:07 PM2018-09-27T17:07:45+5:302018-09-27T17:08:39+5:30
शाळेत शिकवलं असल्यामुळे मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बद्दल माहिती होती. मुलीने नर्सकडे आजोबांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केली असल्याची तक्रार केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबई - आईवडिलांच्या प्रेमाला मुकलेली एक ९ वर्षांची चिमुकली ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील एका रुग्णालयात आली होती. तिला सोबत म्हणून आलेल्या आजोबाने ती एकटी असताना अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी याआरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून नातीचा विनयभंग करणाऱ्या आजोबाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात तिच्यावर ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी आजोबाला अटक केली आहे. शाळेत शिकवलं असल्यामुळे मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’बद्दल माहिती होती. मुलीने नर्सकडे आजोबांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केली असल्याची तक्रार केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी या लहान मुलीच्या आईचं निधन झालं असून ती अनाथआश्रमात राहत होती. मुलीच्या ह्रदयात छिद्र असल्याचं समोर आल्यानंतर सामाजिक संस्थेने ह्रदय शस्त्रक्रियेसाठी तिला रुग्णालयात आणलं होतं. ‘तिचे आजोबा तिच्यासोबत आले होते. २२ सप्टेंबरला ही घटना घडली. चिमुकली बेडवर झोपलेली असताना असताना आजोबाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं मुलीने सांगितलं आहे. मुलीने रुग्णालयातील नर्सला या घटनेची माहिती दिली. नर्सने डॉक्टरांना सांगितल्यानंतर रुग्णालयाने आम्हाला याप्रकरणाची माहिती दिली असे आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.