CoronaVirus: ‘रेमडेसिविर’ची साठेबाजी; मुंबईत २,२०० इंजेक्शन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 06:05 AM2021-04-21T06:05:46+5:302021-04-21T06:06:07+5:30

remedesivir black market: पोलिसांसह ‘एफडीए’चे दोन ठिकाणी छापे. ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश याआधीच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेले आहेत.

Stockpiling of ‘remedesivir’; 2,200 injections seized in Mumbai | CoronaVirus: ‘रेमडेसिविर’ची साठेबाजी; मुंबईत २,२०० इंजेक्शन जप्त

CoronaVirus: ‘रेमडेसिविर’ची साठेबाजी; मुंबईत २,२०० इंजेक्शन जप्त

Next


लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) मदतीने मरोळ आणि न्यू मरिन लाइन्स येथे छापे टाकून २ हजार २०० रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले.


‘रेमडेसिविर’चा तुटवडा असताना मुंबईत काही वितरकांनी रेमडेसिविरचा साठा करून ठेवल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार, मंगळवारी मुंबई पोलीस आणि एफडीएच्या पथकाने अंधेरीतील मरोळ व न्यू मरिन लाइन्स येथे छापा टाकला. या कारवाईत मरोळ येथून २ हजार आणि न्यू मरिन लाइन्स येथून २०० इंजेक्शन मिळून एकूण २ हजार २०० रेमडेसिविर जप्त करण्यात आले. हा सर्व साठा एफडीएला देण्यात आला असून, तो रुग्णालयाला देणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश याआधीच मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेले आहेत.

Web Title: Stockpiling of ‘remedesivir’; 2,200 injections seized in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.