प्राणघातक शस्त्र बाळगणाऱ्या दुकानदाराला कोठडी; कल्याण गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 07:17 PM2019-01-15T19:17:28+5:302019-01-15T19:18:57+5:30
मानपाडा रोड परिसरात तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे धनंजय कुलकर्णीचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती.
डोंबिवली - फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदार धनंजय कुलकर्णी (४९, रा. टिळकनगर) याला कल्याण गुन्हे शाखेने सोमवारी अटक करत त्याच्या दुकानातून १७० शस्त्रास्त्रे हस्तगत केली. कल्याण न्यायालयाने आज धनंजयला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मानपाडा रोड परिसरात तपस्या हाऊस ऑफ फॅशन नावाचे धनंजय कुलकर्णीचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रांचा साठा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सपोनि संतोष शेवाळे, पोउपनिरीक्षक निलेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद पंजे, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, राजेंद्र घोलप, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगारा, राहुल ईशी यांनी सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास दुकानात धाड टाकली. रात्रभर या दुकानाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी 62 स्टील व पितळी धातूचे फायटर्स, 38 बटनचाकू, 25 चॉपर्स, 10 तलवारी, 9 कुकऱ्या, 9 गुप्त्या, 5 सुरे, 3 कुऱ्हाडी, 1 कोयता आणि एक एयरगनसह मोबाईल आणि काही रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचा शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला आहे.