Stolen pornographic photos uploaded from wife's phone, husband went to jail
पत्नीच्या फोनमधून अश्लील फोटो चोरून केले अपलोड, पती थेट गेला तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 08:41 PM2021-12-04T20:41:55+5:302021-12-04T20:42:21+5:30
Cyber Crime : पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला १३ आठवड्यांची शिक्षा सुनावली आहे. फोटो चोरून व्हायरल केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे.
Next
सिंगापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने पत्नीच्या फोनमधून तिचा अश्लील फोटो चोरला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हजारो लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला १३ आठवड्यांची शिक्षा सुनावली आहे. फोटो चोरून व्हायरल केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे.
या प्रकरणावर उप सरकारी वकील फुंग के हुई यांनी सांगितले की, दोघे २०१९ मध्ये वेगळे झाले होते. कारण पत्नीचे कोणाशी तरी अवैध संबंध असल्याचा पतीला संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी तणाव असायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती ६ फेब्रुवारी रोजी पत्नीच्या घरी पोहोचला आणि तिच्या हातातील फोन हिसकावून पळून गेला. त्याला तिच्या फोनवरून खात्री करायची होती की तिचे अवैध संबंध आहेत की नाही.
पत्नीचे अश्लील फोटो चोरून व्हायरल
द स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी पतीने पत्नीच्या मोबाईलमधून प्रियकरासोबत काही खाजगी फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर त्याने पत्नीचा फोन परत केला. मात्र तोपर्यंत महिलेला तिचा खासगी फोटो काढण्यात आल्याची माहिती नव्हती. महिलेचे तिच्या सुपरवायझरसोबत अवैध संबंध होते.
आरोपीचे म्हणणे आहे की, असे करून तो त्या लोकांना सावध करू इच्छित होता की, जी लोकं आपल्या पत्नीवर आंधळा विश्वास ठेवतात. खासकरून ज्यांची पत्नी घरी राहते. असे करून आरोपीला पत्नीची बदनामी करायची होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. फोटो व्हायरल होताच हजारो लोकांनी पाहिले आणि शेअर केले. आरोपीने आधी फोटो डिलीट केला होता. त्यानंतर पुन्हा पोस्ट केले. पण फोटोत बायकोचा फोटो एकदम पुसट दिसत होता.
न्यायालयाने १३ आठवड्यांची शिक्षा सुनावली
पोलिसांनी १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपीला १३ आठवड्यांची शिक्षा कोर्टानं सुनावली. शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी सांगितले की, आरोपीला पत्नीच्या विश्वासघात केल्याचा राग आला होता. रागाच्या भरात त्याने असे कृत्य केले. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
Web Title: Stolen pornographic photos uploaded from wife's phone, husband went to jail