पोटचे गोळे झाले वैरी ! दोन मातांचा गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 10:03 AM2021-08-07T10:03:19+5:302021-08-07T10:03:35+5:30

Crime News: मुलगा झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद आईला किती होतो हे आजही सांगायची गरज नाही पण तो भविष्यात तोच आपला कर्दनकाळ ठरेल हे  त्या माऊलीला त्यावेळी ठावूक नसते.

Stomach balls became enemies! Two mothers died | पोटचे गोळे झाले वैरी ! दोन मातांचा गेला जीव

पोटचे गोळे झाले वैरी ! दोन मातांचा गेला जीव

googlenewsNext

जालना/सातारा : मुलगा झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद आईला किती होतो हे आजही सांगायची गरज नाही पण तो भविष्यात तोच आपला कर्दनकाळ ठरेल हे  त्या माऊलीला त्यावेळी ठावूक नसते. मद्याच्या आहारी गेलेल्या पुत्रांनी मारहाण करत त्यांचा जीव घेतल्याच्या दोन घटना आज राज्यात घडल्या आहेत. रहिमतपूर (जि. सातारा) येथे मद्यपि पुत्राने आईच्या डोक्यात लोखंडी पाट्याने मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यु झाला. दुसऱ्या घटनेत लोणी (जि. जालना) येथे मद्यापि पुत्राने काठीने आईला जबर मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यु झाला.  रहिमतपूर येथे शहाजी लाला पवार (३६) याने वृध्द आई सुलोचना (७०) यांच्या डोक्यात लोखंडी पाट्याने मारहाण त्यांचा खून केला व स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला.  

पोलिसांनी केली आरोपीला अटक
लोणी (ता. परतूर, जि. जालना) सखाराम यदाजी शिंदे (३०)  या मद्यपी तरुणाला आईने दारू पिण्यास विरोध केल्याने राग अनावर झालेल्या मुलाने आईला बेदम मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला.रुंदावती यदाजी शिंदे (६०) असे मयत महिलेचे नाव आहे. मंदिरात पुजारी असलेल्या यदाजी अंबाजी शिंदे (६८) आणि पत्नी रुंदावती (वय ६०) या दाम्पत्याला दोन मुले, दोन मुली आहेत. पोलिसांनी सखारामला अटक केली असून त्याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Stomach balls became enemies! Two mothers died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.