वरळीमध्ये फोर सिझन्स हॉटेलच्या निर्माणाधीन इमारतीवरून दगड पडले; 2 कामगार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 21:52 IST2023-02-14T21:52:17+5:302023-02-14T21:52:45+5:30
ही बिल्डिंग फोर सिझन्स हॉटेलची असल्याची प्राथमिक माहिती आहे.

वरळीमध्ये फोर सिझन्स हॉटेलच्या निर्माणाधीन इमारतीवरून दगड पडले; 2 कामगार ठार
वरळीतील गांधीनगर परिसरात एका काम सुरू असलेल्या इमारतीवरून अचानक दगड रस्त्यावर कोसळला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील चौकशी सुरू आहे.
ही बिल्डिंग फोर सिझन्स हॉटेलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. हॉटेल आणि बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला एकाच दरवाजा आहे. सर्व रहदारी याच दरवाजाने चालते.
मृतांमध्ये इम्रान (रा. कलकत्ता, वय अंदाजे- 20-25) व शब्बीर (रा. बिहार वयअंदाजे-25-30) यांचा समावेश आहे. ते सावी एक्सपोर्टस मध्ये काम करत होते.