लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न थांबविण्यासाठी जेव्हा थेट आयर्लंडच्या फेसबुकमधून फोन आला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 08:47 AM2020-08-10T08:47:24+5:302020-08-10T08:49:03+5:30
हा थरार जवळपास पाच तास चालला. फेसबुकच्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला नसता तर त्या तरुणाने आत्महत्या केली असती. या तरुणाची काऊन्सेलिंग करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचविल्याबाबत कुटुंबीयही आनंदात आहे.
फेसबुकवर एका तरुणाने लाईव्ह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आयर्लंडमध्ये असलेल्या फेसबुक अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी तातडीने दिल्ली पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. दिल्ली पोलीस त्याला शोधण्यासाठी मंडावलीतील घरी पोहोचली. मात्र, तो तिथे नसून मुंबईत असल्याचे समजले. तसेच तो त्याच्या पत्नीचे फेसबुक अकाऊंट वापरत असल्याचे समजले. दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना फोन केला. मुंबई पोलिसांनीही वेळ न दवडता त्या तरुणाला गाठत आत्महत्या करण्यापासून वाचविले.
हा थरार जवळपास पाच तास चालला. फेसबुकच्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला नसता तर त्या तरुणाने आत्महत्या केली असती. या तरुणाची काऊन्सेलिंग करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचविल्याबाबत कुटुंबीयही आनंदात आहे.
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे उपायुक्त डॉ. अनीश रॉय यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी 7.51 वाजता त्यांना आयर्लंडहून फेसबूक अधिकाऱ्यांचा फोन आला. महिला कॉलरने सांगितले की, एका तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न आहे. त्याच्या फेसबुक अकाऊंटचे लोकेशन दिल्ली येत आहे. त्या आकाऊंटचा मोबाईलनंबरही फेसबुकने दिल्ली पोलिसांना दिला. मोबाईल नंबर ट्रेस केला असता तो पूर्व दिल्लीच्या मंडावली येथील होता. रॉय यांनी तातडीने पूर्व जिल्हा पोलीस उपायुक्त जसमीत सिंह यांना फोन करून याची माहिती दिली. त्या पत्त्यावर स्थानिक पोलिसांना पाठविण्यात आले. मात्र, त्या घरात एक महिलाच होती. तिने सांगितले की नंबर तिचाच असून ती ठीक आहे. फेसबुक खाते तिचा पती वापरतो.
14 दिवसांपूर्वी तिचा पती भांडण करून मुंबईला गेला होता. तिने तिच्या पतीचा नंबर पोलिसांना दिला. मात्र, तिला त्याचा मुंबईतील पत्ता माहित नव्हता. यानंतर रॉय यांनी मुंबईच्या सायबर सेलचे पोलीस उपायुक्त बाल सिंह राजपूत यआणि डॉ. रश्मी यांना फोन केला. तरुणाच्या फोनवर संपर्क साधला असता तो बंद येत होता.
मुंबई पोलिसांनी त्या तरुणाची माहिती काढत त्याच्या भाईंदरच्या घरी पथक पाठविले. तेथे हा तरुण चांगल्या स्थितीत होता. तो हॉटेलमध्ये कुकचे काम करतो. आयुष्यातील समस्यांनी त्रस्त झाल्याने आत्महत्या करणार होतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला समजावले आणि त्याची काऊन्सेलिंगही केले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा
बापरे! कोरोना पाठ सोडेना; निगेटिव्ह रुग्ण महिनाभरात दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह
बाबो! आरोग्य पथक दिसताच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने ठोकली धूम; एक तासानंतर लागला हाती
Video: 'कामं होत नसतील तर दंगा घाला'; यशोमती ठाकूरांचे महसूलमंत्र्यांसमोर वादग्रस्त वक्तव्य
चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'
रिया एकटी नाहीय, सुशांतचे पैसे उडविण्यात सीएही सहभागी; ED समोर केला मोठा गौप्यस्फोट
Government Jobs: AIIMS मध्ये नोकरीची बंपर संधी; नर्सना मिळणार सातवा वेतन आयोग
BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत