कट्टरतावाद प्रशिक्षणामुळेच जुनेद बनला आतंकवादी!, घरची परिस्थिती हलाखीची

By अनिल गवई | Published: August 30, 2022 03:42 PM2022-08-30T15:42:05+5:302022-08-30T15:43:39+5:30

तालुक्यातील गोंधनापूर येथील मुळचा रहिवासी असलेला आणि महाराष्ट्र दहशातवाद विरोधी पथकाने पुण्यातून अटक केलेला मो. जुनेद हा कट्टरतावाद  प्रशिक्षणामुळेच आतंकवादी बनला

story of Junaid who became a terrorist because of lack of financial condition | कट्टरतावाद प्रशिक्षणामुळेच जुनेद बनला आतंकवादी!, घरची परिस्थिती हलाखीची

कट्टरतावाद प्रशिक्षणामुळेच जुनेद बनला आतंकवादी!, घरची परिस्थिती हलाखीची

googlenewsNext

खामगाव: 

तालुक्यातील गोंधनापूर येथील मुळचा रहिवासी असलेला आणि महाराष्ट्र दहशातवाद विरोधी पथकाने पुण्यातून अटक केलेला मो. जुनेद हा कट्टरतावाद  प्रशिक्षणामुळेच आतंकवादी बनला असल्याचे समोर येत आहे. गोंधनापूर (ता. खामगाव) येथे वास्तव्यास असताना दोन वेगवेगळ्या वेल्डींग वर्कशॉपमध्ये तो काम करीत होता. दरम्यान, पुणे येथे बहिणीकडे वास्तव्याला असतानाच तो कट्टरवाद प्रशिक्षणासाठी गेल्याचेही आता समोर येत आहे. तथापि, जुनेदकडून त्याच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळत नसल्याची चर्चा आहे.

पुणे येथे वास्तव्यास असताना मो. जुनेद मो. अता जम्मू-काश्मिरातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या संपर्कात आला. या संघटनेकडून ठराविक वेळेत त्याला कट्टरतावादाचे प्रशिक्षण देण्यात आले. कट्टरता वादाच्या प्रशिक्षणानंतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याने वेगवेगळे अकाऊंट तयार केले. बनावट सोशल मिडीया प्रोफाईलद्वारे तो दहशतवादी सहकाºयांच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा गावाशी आणि कुटुंबियांशी संपर्क तुटल्याचे समोर येत आहे. गावातील शेजाºयांनाही मो. जुनेद याच्याबाबतीत फारशी माहिती नाही.

सुटाळा, एमआयडीत केले ‘वेल्डींग’!
- गोंधनापूर येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मो. जुनेद याने खामगावात माध्यमिक शिक्षण घेतले. दहावीपर्यंतचे शिक्षण खामगावातील एका नामांकित शाळेत घेतले.  उपजिविकेसाठी तो सुटाळा येथील एका वेल्डींग वर्कशॉपमध्ये काम करायचा. त्यानंतर एमआयडीसीतील एका वेल्डींग वर्कशॉपमध्ये काही काळ त्याने काम केले. या कालावधीत  एमआयडीसीतील एका प्रसिध्द कंपनीच्या गेटचे वेल्डींगही त्याने केले होते. दरम्यान, पुणे येथे बहिणीकडे गेला. तेथे वास्तव्यास असताना दहशातवाद्यांच्या संपर्कात आला.

उत्तर प्रदेश पोलीसांच्या केले स्वाधीन
दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या मो. जुनेद याला २४ मे रोजी पुण्यातून अटक करण्यात आली. गत आठवड्यात त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर मो. जुनेदला उत्तर प्रदेश पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी गत सहा-सात महिन्यांपासून अकोला दहशतवाद विरोधी पथकाची चमू अतिशय गुप्तपणे काम करीत होती.

Web Title: story of Junaid who became a terrorist because of lack of financial condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.