विचित्र अन् धक्कादायक; कोरोना रुग्णाची लाळ वापरून बॉसला ठार मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

By पूनम अपराज | Published: February 9, 2021 06:34 PM2021-02-09T18:34:32+5:302021-02-09T18:37:42+5:30

Attempt to murder : दक्षिण-पूर्व तुर्कीमधील अदाना येथील रहिवासी असलेल्या इब्राहिम उर्वेंडी यांनी तीन वर्ष त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कर्मचाऱ्याने बॉसला कोरोनाची लागण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

Strange and shocking; Man spikes his boss’ drink with COVID-19 patient’s saliva; charged with attempted murder | विचित्र अन् धक्कादायक; कोरोना रुग्णाची लाळ वापरून बॉसला ठार मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

विचित्र अन् धक्कादायक; कोरोना रुग्णाची लाळ वापरून बॉसला ठार मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे उर्वेंडी या बॉसने असा दावाही केला आहे की, माजी कर्मचार्‍यांनी पैसे चोरुन नेण्यापूर्वी कोविड -१९च्या रूग्णाच्या लाळ असलेले पेय दिले होते. सुदैवाने, उर्वेंडीने त्या पेयाचा वापर केला नाही.

कोरोना रूग्णाकडून लाळ खरेदी करून एका कर्मचार्‍याने बॉसला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा कार डीलरशिप मालकाने केला आहे. दक्षिण-पूर्व तुर्कीमधील अदाना येथील रहिवासी असलेल्या इब्राहिम उर्वेंडी यांनी तीन वर्ष त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कर्मचाऱ्याने बॉसला कोरोनाची लागण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

उर्वेंडी यांनी गाडीची विक्री केल्यानंतर कर्मचाऱ्याला  215,000 तुर्की लीरा (22 लाख रुपये) दिले आणि पैसे ऑफिसमध्ये नेण्यास सांगितले. "त्याच्याकडे माझी चावी देखील होती, मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. नंतर, मी त्याला बर्‍याच वेळा फोन केला आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. दुसर्‍याच दिवशी त्याने उत्तर दिले. त्याने सांगितले की, मला पैशाची गरज आहे आणि मी चोरी केली कारण मी कर्जबाजारी झालो आहे, असे उर्वेंडीचे म्हणणे असल्याची  माहिती LADbibleने दिली आहे.


उर्वेंडी या बॉसने असा दावाही केला आहे की, माजी कर्मचार्‍यांनी पैसे चोरुन नेण्यापूर्वी कोविड -१९च्या रूग्णाच्या लाळ असलेले पेय दिले होते. सुदैवाने, उर्वेंडीने त्या पेयाचा वापर केला नाही. "आरोपीने कोविड -१९च्या रूग्णातून ५०० तुर्की लिरा (5,000 रुपये) किंमतीत लाळ विकत घेतली आणि माझ्या पेयात मिसळण्याचा प्रयत्न केला. मला माझ्या एका कर्मचार्‍याकडून याबद्दल माहिती मिळाली," असे उर्वेंडी म्हणाले.

पाकिस्तानच्या तुरुंगातून १८ वर्षांनंतर महाराष्ट्रात परतलेल्या हसीना बेगम यांचं निधन


कर्मचाऱ्याने पाठवलेले धमकीचे मेसेज उर्वेंडी यांनी पोलिसांना दाखवले, त्यातून कोरोना व्हायरसने जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे याची माहिती उघड होत होती. ते पुढे म्हणाले की, अशाच एका मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, "मी तुम्हाला कोरोनाच्या विषाणूने मारू शकलो नाही. पुढच्या वेळी तुला गोळ्या घालू." ते पुढे म्हणाले, "अशी विचित्र हत्या करण्याचे तंत्र मी पहिल्यांदा ऐकले आहे. देवाचे आभार मानतो की, मी आजारी पडलो नाही. देव नेहमीच माझ्याबरोबर असतो." या कर्मचार्‍यावर खुनाचा प्रयत्न आणि धमकी देण्याच्या प्रयत्नाचा आरोप आहे.

Web Title: Strange and shocking; Man spikes his boss’ drink with COVID-19 patient’s saliva; charged with attempted murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.