बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अजब शिक्षा, गावातील २ हजार महिलांचे कपडे मोफत धुण्याचे कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:20 PM2021-09-23T23:20:59+5:302021-09-23T23:21:28+5:30

Crime News: बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील एका कोर्टाने महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीला अजब शिक्षा दिली आहे. या आरोपीला गावातील सर्व महिलांचे कपडे मोफत धुण्याची आणि इस्त्री करून देण्याचे आदेश दिले आहेत.

Strange punishment for accused who attempted rape, court orders free washing of clothes of 2,000 women in the village | बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अजब शिक्षा, गावातील २ हजार महिलांचे कपडे मोफत धुण्याचे कोर्टाचे आदेश

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अजब शिक्षा, गावातील २ हजार महिलांचे कपडे मोफत धुण्याचे कोर्टाचे आदेश

Next

पाटणा - बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील एका कोर्टाने महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीला अजब शिक्षा दिली आहे. या आरोपीला गावातील सर्व महिलांचे कपडे मोफत धुण्याची आणि इस्त्री करून देण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अविनाश कुमार यांनी हे आदेस आरोपी ललन कुमार साफी या दिले असून, त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. (Strange punishment for accused who attempted rape, court orders free washing of clothes of 2,000 women in the village)

आरोपी यावर्षी एप्रिलपासून तुरुंगात आहे. दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले की, तो कपडे धुण्याचे काम करतो. तसेच समाजसेवा करण्याची त्याची इच्छा आहे. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनीही तक्रारदार तडजोडीस तयार असल्याचे कोर्टात सांगितले.

त्यानंतर कोर्टाने आरोपीला जामीन देण्याचा आदेश दिला. तसेच २० वर्षीय ललन कुमार याला मझोर गावातील सुमारे दोन हजार महिलांचे कपडे सहा महिन्यांपर्यंत मोफत धुण्याचे आणि त्यांना इस्त्री करम्याचे आदेश दिले. तसेच या सर्वाचा खर्च ललन कुमार याला स्वत: करावा लागेल. ललन कुमार याला एप्रिल महिन्यात बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते.

याबाबत गावच्या सरपंच  नसिमा खातून यांनी सांगितले की, कोर्टाच्या निकालाबाबत गावातील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान वाढवण्यात मदत होईल. दरम्यान, कोर्टाच्या या आदेशाने महिलांविरोधातील गुन्ह्याला समाजात चर्चेचा विषय बनवून चांगला प्रभाव पाडला आहे, असे सांगितले.  

Web Title: Strange punishment for accused who attempted rape, court orders free washing of clothes of 2,000 women in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.