कल्याणात पहाटेची पहिली अजान भोंग्याविना, मशिदीबाहेर पोलिसांचा कडक पहारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 02:44 PM2022-05-04T14:44:55+5:302022-05-04T14:46:01+5:30
MNS Loudspeaker : मनसेच्या ५० पेक्षा जास्त जणांना नोटिसा
कल्याण - कल्याणमध्ये आज मशिदीत पहाटेचे आजान भोंग्या विना झाली. मशिदीच्या बाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी कालपासूनच मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा पाठविल्या होत्या. ५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना नोटिसा पाठविल्या होत्या. तर २९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यायाबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे . मशिदीवरील भोंग्या समोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते नागरिकांना केले होते. .या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने काल रात्रीपासूनच पाउले उचलण्यास सुरुवात केली .
काल रात्री पासूनच मजीद मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे .शहरात काही अनुचित प्रकार घडू नये या साठी मशीद मंदिराबाहेर पोलिसांचा पहारा दिसून येतोय .याच बरोबर पोलिसांनी मशिदीमधील मौलांनाशी चर्चा करून आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील केले होतं .आज कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास जान भोंग्या विना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते .पोलीस यंत्रणेने शहरात कायदा सुव्यवस्था राखावी तसेच शांततेचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून नागरिक तसेच मनसे कार्यकर्त्यांना करण्यात आली. रात्री दहा ते पहाटे सहा या वेळेत ध्वनिक्षेपक वापरण्यास बंदी असल्याने आज पहाटेचे आजान भोंग्याविना झाली.
दरम्यान आज दुपारी साडे बारा वाजता मनसेच्या महिला आघाडीने शिवाजी चौकातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र त्याठिकाणी पोलिसांचा फौजफाटा पोहचला. स्वत: पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ हे हनुमान मंदिरात पोहचले. परिस्थितीती पाहणी केली. मात्र त्याठिकाणी महिला कार्यकर्त्या पोहचल्याच नाहीत. काही वेळेनंतर पोलिस ही त्याठिकाणीहून निघून गेले. दुपारी १ वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत ठाकरे काय बोलतात. यामुळे मंदिरातील हनुमान चालिसा पठण करणे महिला वगार्ने टाळले असावे.