धक्कादायक! स्ट्रोकनंतर हॉस्पिटलमध्ये दाखल महिलेवर बलात्कार, मृत्यूनंतर पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:12 AM2021-05-11T11:12:23+5:302021-05-11T11:14:56+5:30
UK : ७५ वर्षीय वेलेरी नेलच्या मृत्यूनंतर पोलिसांना तपासात आढळून आलं की, महिलेचा मृत्यू चिकिस्तेसंबंधी कोणत्याही अंतर्गत इजेमुळे झाला नाही.
यूके (UK) मध्ये एका वयोवृद्ध महिलेसोबत हॉस्पिटल लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेनंतर महिलेची तब्येत आणखी बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. या महिलेला स्ट्रोल आला होता. तसेच खुर्चीवरून पडल्याने तिच्या पायाची हाड मोडलं होतं. ज्यानंतर तिला ब्लॅकपूल व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
कर्मचाऱ्याला अटक
७५ वर्षीय वेलेरी नेलच्या मृत्यूनंतर पोलिसांना तपासात आढळून आलं की, महिलेचा मृत्यू चिकित्सेसंबंधी कोणत्याही अंतर्गत इजेमुळे झाला नाही. तर या प्रकरणी हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याला रेप आणि सेक्शुअल हरॅसमेंट करण्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. (हे पण वाचा : शारीरिक संबंधास नकार दिल्याने केला खून; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या अंगावार झोपला होता चिमुकला)
कसा झाला खुलासा?
तपास करणारे अधिकारी एलन विल्सन म्हणाले की, 'वेलेरी नेलला स्ट्रोक आणि डाब्या पायात फ्रॅक्चरमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर तिची तब्येत आणखीन जास्त बिघडली होती. ज्यानंतर तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिलेच्या प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला जखमांचे निळे निशाण आढळून आले. ज्यामुळे पोलीस या केसचा तपास करत आहेत. (हे पण वाचा : आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या इसमाची चाकू भोसकून केली हत्या; दोन भावंडांवर गुन्हा दाखल )
नेलचा १६ नोव्हेंबर २०१८ मध्ये मृत्यू झाला होता. महिनाभरानंतर हॉस्पिटलच्या स्ट्रोक यूनिटवर रूग्णाच्या उपचाराच बेजबाबदारपणाचा आरोप लागल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला होता. बेजबाबदारपणामुळे या यूनिटमधील ९ रूग्णांचा मृत्यू झाला होता. ज्यात एका महिलेचाही समावेश आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी हॉस्पिटलमधील एकूण ९ कर्मचाऱ्यांना अटक केली होती. ते सगळे सध्या जामिनावर बाहेर आहेत.