तुझ्या पोटी जन्म घेऊन धन्य झालो, पण...; सुसाइड नोट लिहून विद्यार्थ्यानं १५ व्या मजल्यावरुन घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 11:44 AM2022-02-26T11:44:40+5:302022-02-26T11:45:23+5:30

सोसायटीच्या लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Student Commits Suicide By Jumping From 15th Floor In Faridabad Allegations Of Molestation | तुझ्या पोटी जन्म घेऊन धन्य झालो, पण...; सुसाइड नोट लिहून विद्यार्थ्यानं १५ व्या मजल्यावरुन घेतली उडी

तुझ्या पोटी जन्म घेऊन धन्य झालो, पण...; सुसाइड नोट लिहून विद्यार्थ्यानं १५ व्या मजल्यावरुन घेतली उडी

Next

फरिदाबाद – शहरातील डिस्कवरी सोसायटीच्या टेरेसवरुन दहावीच्या विद्यार्थ्याने उडी मारुन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येने सोसायटीत खळबळ माजली. आत्महत्येपूर्वी विद्यार्थ्याने सुसाइड नोटही लिहिली होती. त्यात शाळा प्रशासनाला स्वत:च्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. १६ वर्षीय विद्यार्थी त्याच्या आईसोबत डिस्कवरी सोसायटीत राहत होता.

आई मुलाच्या शाळेत शिक्षिका म्हणूनही काम करते. शाळेतील मुलं मृत विद्यार्थ्याला गे म्हणून चिडवायचे. अनेक वर्षांपासून त्याला त्रास होत होता. याबाबत शाळा प्रशासनाला तक्रार देऊनही काही कारवाई झाली नाही. सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून विद्यार्थी मानसिक तणावाखाली गेला. दिल्लीत त्याच्यावर उपचार सुरु होते. गौरवच्या आईचं म्हणणं आहे की, २३ फेब्रुवारीला त्याचा विज्ञानाचा पेपर होता. प्रश्न समजून घेण्यासाठी त्याने ममता गुप्ता या शिक्षिकेची मदत मागितली. परंतु त्यांनी विद्यार्थ्याला ओरडून आजाराचा फायदा उचलत असल्याचं म्हटलं.

ममताने मृत विद्यार्थी आणि त्याच्या आईला खूप सुनावलं. हे पाहून गौरव रडायला लागला. तो इतका घाबरला की त्याने दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला. परंतु आईनं समजवल्यानंतर तो शाळेत गेला. २००६ मध्ये गौरवच्या आईचा पतीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती एकटीच मुलाचं पालनपोषण केले. गुरुवारी रात्री आई त्यांच्या वडिलांना औषध देण्यासाठी गेली होती. तेव्हा रात्री १० च्या सुमारास सोसायटीच्या टेरेसवरुन विद्यार्थ्याने उडी मारुन आत्महत्या केली. सोसायटीच्या लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सुसाइड नोटमध्ये काय लिहिलं होतं?

प्रिय आई, तू जगातील सर्वात चांगली आई आहे. मला खेद वाटतो मी तुझ्यासारखा शूर बनलो नाही. या शाळेने मला मारुन टाकलं. मी या द्वेषाच्या दुनियेत जगू शकत नाही. मी जगण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु आयुष्याला दुसरंच काहीतरी हवं. लोकं माझ्याबद्दल काय बोलतात यावर विश्वास ठेवू नको. तू खूप चांगली आहेस. कुटुंबाला माझ्यासोबत काय घडलं ते सांग. कुणी काही बोललं तर पर्वा करु नको. जर मी मेलो तर तू नवीन नोकरी शोध. तू कला शिक्षिका आहेस. तुझ्यापोटी मी जन्म घेऊन धन्य झालो. मी मजबूत नव्हे तर कमकुवत आहे याचा खेद वाटतो असं त्याने मृत्युपूर्वी सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं.

Web Title: Student Commits Suicide By Jumping From 15th Floor In Faridabad Allegations Of Molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.