मानेवर केमिकल्स टाकून विद्यार्थिनीने लांबविली वकीलाची सानेसाखळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 08:10 PM2019-10-06T20:10:09+5:302019-10-06T20:14:23+5:30

विद्यार्थिनीला लोकांनी पाठलाग करुन पकडल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली. 

Student snatched goldchain of advocate by putting chemicals on her the neck | मानेवर केमिकल्स टाकून विद्यार्थिनीने लांबविली वकीलाची सानेसाखळी

मानेवर केमिकल्स टाकून विद्यार्थिनीने लांबविली वकीलाची सानेसाखळी

googlenewsNext
ठळक मुद्देहर्षदा ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बीबीएमच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. अ‍ॅड.पूजा व्यास यांच्या फिर्यादीवरुन हर्षदा हिच्याविरुध्द शहर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव - फुले मार्केटमध्ये खरेदी करीत असलेल्या पूजा ओमप्रकाश व्यास (रा.बालाजी पेठ) या वकील तरुणीच्या पाठीवर व मानेवर केमिकल्स टाकून गळ्यातील २० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी लांबविणाऱ्या हर्षदा किशोर महाजन (रा.बोदवड) या उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला लोकांनी पाठलाग करुन पकडल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली. 

हर्षदा ही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बीबीएमच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. अ‍ॅड.पूजा व्यास यांच्या फिर्यादीवरुन हर्षदा हिच्याविरुध्द शहर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षदा ही सधन शेतकऱ्याची मुलगी असून तिच्याकडे बोदवड येथे ८० एकर बागायत शेती आहे. जळगावला विद्यापीठाच्या वसतीगृहातच ती वास्तव्याला आहे. तिने चोरी का केली याचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलीस खोलात तपास करीत आहेत.

Web Title: Student snatched goldchain of advocate by putting chemicals on her the neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.