विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणं पडलं महागात, खाजगी क्लासमधील शिक्षकाविरोधात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 02:20 PM2018-10-01T14:20:36+5:302018-10-01T14:21:09+5:30

पोलीस देखील सुनील पाटील या शिक्षकाची चौकशी करत असल्याचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी 'लोकमत'शी बोलताना माहिती दिली. 

The student suffered a fierce assault, a crime against a teacher in private class | विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणं पडलं महागात, खाजगी क्लासमधील शिक्षकाविरोधात गुन्हा 

विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणं पडलं महागात, खाजगी क्लासमधील शिक्षकाविरोधात गुन्हा 

googlenewsNext

विरार -  विरार येथे एका खासगी क्लासमधील शिक्षकाने विद्यार्थ्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. क्लासमध्ये गणिताचे उत्तर चुकल्याने संतापलेल्या शिक्षकाने लाकडी दांडा तुटेपर्यंत विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. हिमांशू बिस्ट (वय १४) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो नववीत शिकत आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नववीत शिकणारा हिमांशू विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील सई क्लासेसमध्ये खासगी शिकवणीसाठी जातो. शनिवारी क्लासमध्ये दिलेल्या गणिताचे उत्तर चुकल्याने शिक्षक सुनील पाटील याने त्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्याच्या पालकाने केला आहे. तसेच शिवीगाळ, दमदाटी केली. या शिक्षकाले हिमांशूच्या हातावर, पायावर, पाठीवर, पोटावर  दांड्याने 10 ते 12 फटके मारले . त्यावेळी लाकडी दांडाही तुटल्याचे हिमांशूने पालकांना सांगितले. त्यानंतर हिमांशूच्या पालकांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  मारहाणीचे व्रण हिमांशूच्या अंगावर उमटले आहेत. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात भा. दं. वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. त्यानुसार पोलीस देखील सुनील पाटील या शिक्षकाची चौकशी करत असल्याचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी 'लोकमत'शी बोलताना माहिती दिली. 

Web Title: The student suffered a fierce assault, a crime against a teacher in private class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.