परीक्षेत पास करण्यासाठी प्रोफेसरकडून सेक्सची मागणी; खळबळजनक ऑडिओ क्लीप व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 10:18 AM2020-07-31T10:18:14+5:302020-07-31T10:18:42+5:30
ज्या प्रोफेसरवर हे आरोप लागलेले आहेत ते युनिवर्सिटी ऑफ बर्दवानमध्ये इंग्रजी साहित्याचे धडे देतात. या प्रोफेसरच्या पत्नीच्या हवाल्याने दावा केला आहे
कोलकाता – पश्चिम बंगालमधील युनिवर्सिटी ऑफ बर्दवानमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या प्रोफेसरवर गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. या प्रोफेसरची एक ऑडिओ क्लीप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिपमधील संवादातून त्यांनी केलेले अश्लिल चाळे उघडकीस आले आहेत, ते मुलींचा पाठलाग करतात, ही ऑडिओ क्लीप त्यांच्या पत्नीची आहे. ज्यात ती प्रोफेसरच्या अश्लिल वागणुकीबाबत सांगत आहे.
ज्या प्रोफेसरवर हे आरोप लागलेले आहेत ते युनिवर्सिटी ऑफ बर्दवानमध्ये इंग्रजी साहित्याचे धडे देतात. या प्रोफेसरच्या पत्नीच्या हवाल्याने दावा केला आहे की, गेल्या २० वर्षापासून ते विद्यार्थींनाचा पाठलाग करत त्यांचे लैगिंक शोषण करत आहेत. या ऑडिओ क्लीपमध्ये त्यांच्या पत्नींनी मुलींचीही नावं घेतली आहेत. शारिरीक सुखाची मागणी करत त्यांना परीक्षेत मार्क्स देण्याचं लालच देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जी मुलगी प्रोफेसरची मागणी पूर्ण करते तिला परीक्षेत चांगले मार्क्स आणि कंपनीत प्लेसमेंट देण्याची गॅरेंटीही दिली जाते.
ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थी युनियनकडून प्रोफेसरविरोधात कुलगुरुंकडे तक्रार देण्यात आली आहे. यानंतर विद्यापीठाने यावर कायदेशीवर कारवाई करु असं आश्वासन दिलं आहे. या तक्रारीत म्हटलं आहे की, अनेक विद्यार्थींनीसोबत प्रोफेसरांचे अफेअर सुरु आहेत. या प्रकारामुळे विद्यापीठाची विश्वासर्हता धोक्यात आली आहे. या ऑडिओ क्लीपबाबत योग्य चौकशी करुन यातील सत्य समोर आणावं असं म्हटलं आहे.
याबाबत कुलगुरु निमई चंद्रा सहा यांनी सांगितले आहे की, हे प्रकरण इंटरनल कम्प्लेंट कमिटीकडे सोपवण्यात आलं याच्या प्रमुखपदी कायदे विभागाच्या महिला शिक्षिका यांची नेमणूक केली आहे. त्यासोबतच आतापर्यंत आमच्याकडे एकाही विद्यार्थीनीने तक्रार केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. ९ सदस्यीय इंटरनल कम्प्लेंट कमिटी चौकशी करणार आहे. या प्रकरणावर भाष्य करण्यास प्रोफेसर यांनी नकार दिला आहे.