वडिलांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी 'ती' विकत होती किडनी; पण झाली 16 लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:26 PM2022-12-14T12:26:39+5:302022-12-14T12:26:58+5:30
वडिलांकडून घेतलेले 'कर्ज' फेडण्यासाठी विद्यार्थिनीने आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला. मात्र तिचीच फसवणूक होऊन तिला तब्बल 16 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. वडिलांकडून घेतलेले 'कर्ज' फेडण्यासाठी विद्यार्थिनीने आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतला. मात्र तिचीच फसवणूक होऊन तिला तब्बल 16 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. गुंटूर येथील एका नर्सिंग विद्यार्थिनीने हा दावा केला आहे. सोमवारी स्पंदन कार्यक्रमादरम्यान ती तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली होती. विद्यार्थिनीने वडिलांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये काढले होते, जे तिला परत करायचे होते.
वडिलांचे पैसे परत करण्यासाठीने तिने आपली किडनी विकायचा मोठा निर्णय घेतला. तेव्हा काही लोकांनी तिला तीन कोटी रुपयांची ऑफर दिली. यानंतर त्यांनी विद्यार्थिनीकडून टॅक्स आणि पोलीस व्हेरिफिकेशनसाठी तब्बल 16 लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी पीडितेला वचन दिले की ऑपरेशनपूर्वी 50 टक्के रक्कम म्हणजे 1.5 कोटी रुपये देण्यात येईल आणि उर्वरित रक्कम ऑपरेशननंतर मिळेल.
"किडनी विकायली गेली अन् तब्बल 16 लाख गमावून बसली"
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या लोकांनी सिटी बँकेत खाते उघडले आणि त्यात तीन कोटी रुपये पाठवले. जेव्हा विद्यार्थिनीने 16 लाख रुपये व्हेरिफिकेशन चार्ज भरल्यावर आपले पैसे परत मागितले. यानंतर ते म्हणाले की, यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागेल. फसवणूक करणाऱ्यांनी विद्यार्थिनीला दिल्लीचा एक खोटा पत्ता देखील दिला होता.
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी त्यांचं एक एटीएम कार्ड मुलीला वापरण्यासाठी दिलं होतं. पण त्यांना नोव्हेंबरमध्ये काही पैसे यामधून काढून घेतल्याचं समजलं. त्यांनी मुलीला वसतीगृह सोडून परत घरी येण्यास सांगितल्यावर ती कुठेतरी निघून गेली. यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. नंतर समजलं की ती एनटीआर जिल्ह्यातील जगय्यापेटा येथे मित्राच्या घरी होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"