सातवीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला शाळेतच अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 04:53 AM2020-01-19T04:53:40+5:302020-01-19T04:54:11+5:30

पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

student was mistreated by teachers at school | सातवीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला शाळेतच अत्याचार

सातवीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला शाळेतच अत्याचार

Next

बिलोली (जि़ नांदेड) : शंकरनगर येथील श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयातील सातवीच्या अल्पवयीन मुलीस मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर शाळेतच लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी दोन शिक्षकांसह प्राचार्य, मुख्याध्यापक व स्वयंपाकी महिला अशा पाच जणांविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सहशिक्षक सय्यद रसूल, दयानंद राजुळे, प्राचार्य शेळके, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, स्वयंपाकी सुरेखाबाई बनसोडे अशी या पाच जणांची नावे आहेत.

पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दोन महिन्यांपूर्वी श्री साईबाबा माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक रसूल सय्यद व दयानंद राजुळे यांनी पीडित मुलीस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नृत्याचे व्हिडीओ दाखवतो म्हणून बंद खोलीत नेले़ तेथे तिला मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ व फोटो दाखवून तिच्यावर अत्याचार केला़ तसेच या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. 

मुलीने संबंधित प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने दोन महिन्यांपूर्वी शाळा गाठून मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती़ त्या वेळी मुख्याध्यापक व इतरांनी पीडित मुलीच्या आईची समजूत घालून परत पाठविले होते़ तसेच ही बाब कोणासही न सांगण्याच्या अटीवरून अल्पवयीन मुलीच्या आईकडून शपथपत्र लिहून घेण्यात आले होते़ पीडित मुलीची आई मजुरी करते़ मुलीच्या बदनामीच्या भीतीने त्याही गप्प राहिल्या़

ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे गुन्हा
गावात याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी पीडित मुलीच्या आईला ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला़ आईच्या तक्रारीनुसार, उपरोक्त पाच जणांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे़, असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी सांगितले.

Web Title: student was mistreated by teachers at school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.