वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 04:40 PM2019-08-15T16:40:19+5:302019-08-15T16:43:13+5:30
शाळकरी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियमी तोडणाऱ्यांना राखी बांधून वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे.
नवी मुंबई - वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी प्रवाशांना शाळेतील विद्यार्थींनी राख्या बांधल्या. बिना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सिटबेल्ड न लावणाऱ्या चारचाकी वाहन चालकांना तसेच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी एपीएमसी आणि तुर्भे वाहतूक पोलिसांनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत आज रक्षाबंधननिमित्त अनोखा कार्यक्रम हाती घेतला. शाळकरी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियमी तोडणाऱ्यांना राखी बांधून वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश दिला आहे.
एपीएमसी मार्केट ते तुर्भे या रोडदरम्यान वाहतूक पोलिसांनी हा कार्यक्रम राबविला. या रोडदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगून नियम तोडणाऱ्यांना विद्यार्थ्यांनी राख्या बांधल्या. एपीएमसी आणि तुर्भे वाहतूक पोलिसांच्यावतीने तुर्भे येथील डॉ. सीताराम विश्वनाथ सामंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला.