वेकोलीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना अटक, सीबीआयचा ट्रॅप

By योगेश पांडे | Published: February 3, 2023 10:17 PM2023-02-03T22:17:57+5:302023-02-03T22:21:37+5:30

गौतम बसुतकर असे संबंधित व्यवस्थापकाचे नाव आहे. संबंधित फर्मला खाणीतून ८ हजार २०० टन मेट्रीक कोळसा उचलण्याची परवानगी होती.

Sub Area Manager of Vekoli arrested by CBI for taking bribe in nagpur | वेकोलीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना अटक, सीबीआयचा ट्रॅप

वेकोलीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना अटक, सीबीआयचा ट्रॅप

googlenewsNext

योगेश पांडे 

नागपूर : वेकोलिच्या यवतमाळमधील वणी येथील घोन्सा खाणीच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाला लाच घेताना सीबीआयकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. एका फर्मला डिलिव्हरी ऑर्डर देण्याच्या बदल्यात ३.२३ लाखांची लाचेची मागणी करत एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता घेताना ही कारवाई करण्यात आली. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.

गौतम बसुतकर असे संबंधित व्यवस्थापकाचे नाव आहे. संबंधित फर्मला खाणीतून ८ हजार २०० टन मेट्रीक कोळसा उचलण्याची परवानगी होती. मात्र फर्मला ४ हजार ६२३ मेट्रीक टन कोळसाच उचलता आला. उर्वरित कोळसा उचलण्यासाठी डिलिव्हरी ऑर्डर देण्याची संबंधित फर्मने विनंती केली. मात्र बसुतकरने परवानगी नाकारली व लाचेची मागणी केली. अगोदर केलेली मदत व २ हजार ५०० मेट्रीक टन कोळसा उचलण्याच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या बदल्यात व्यवस्थापकाने रकमेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित फर्मच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची शहानिशा केली व सापळा रचला. एक लाखांच्या पहिल्या हफ्त्याचे पैसे घेताना बसुतकरला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याशिवाय त्याचे कार्यालय व निवासस्थानाचीदेखील झडती घेण्यात आली.

Web Title: Sub Area Manager of Vekoli arrested by CBI for taking bribe in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.