जालन्यात तीन सावकारांच्या घरावर उपनिबंधक पथकाची धाड; लाखोंच्या व्यवहाराची कागदपत्रे हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:20 PM2019-12-17T17:20:15+5:302019-12-17T17:25:14+5:30

पीडितांच्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची कारवाई 

The sub-divisional squad's strike on the house of three lenders in Jalna district; Expose billions of transactions | जालन्यात तीन सावकारांच्या घरावर उपनिबंधक पथकाची धाड; लाखोंच्या व्यवहाराची कागदपत्रे हाती

जालन्यात तीन सावकारांच्या घरावर उपनिबंधक पथकाची धाड; लाखोंच्या व्यवहाराची कागदपत्रे हाती

googlenewsNext
ठळक मुद्देमोठ्या व्यवहाराची अनेक कागदपत्रे,बॉंड लागली हाती

जालना : अवैधरित्या सावकरी करणाऱ्या तीन सावकारांच्या घरासह एका दुकानावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या चार पथकांनी धाडी मारल्या. या कारवाई मंगळवारी सकाळी अंबड तालुक्यातील सुखापुरी, रेवलगाव येथे करण्यात आल्या. या कारवाईत, बॉण्ड, चेक, रजिस्ट्रीसह इतर कागदपत्रे हाती लागली आहेत.

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील एकाने तीन सावकारांविरुद्ध तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी चार टीम तयार केल्या. त्यानुसार मंगळवारी सकाळी या पथकांनी रेवलगाव येथील सरुबाई विश्वनाथ भोंडवे यांच्या घरी, सुखापुरी येथील काकासाहेब तुळशीराम राखुंडे यांच्या घरी, दुकानी, रामदास चोखाजी पटेकर यांच्या घरी धाड टाकली. या कारवाईत अनेक बॉण्ड, चेक, राजिष्ट्रीचे कागदपत्र सापडली आहेत. या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले. या पथकात अंबडचे सहाय्यक निबंधक परेश बेरा, जालन्याचे सहाय्यक निबंधक परमेश्वर वरखडे, घनसावंगीचे सहाय्यक निबंधक अजय भिल्लारे, परतूरचे सहाय्यक निबंधक प्रणव वाघमारे, भोकरदनचे सहाय्यक निबंधक श्रीराम सोनने यांचा सहभाग होता. 

३८ जणांचा सहभाग
अंबड तालुक्यातील रेवलगाव, सुखापुरी येथे पाच पथकांनी कारवाई केली. यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत २० अधिकारी, कर्मचारी, १० पोलीस कर्मचारी व ८ पंच या ३८ जणांचा सहभाग होता.

कोट्यवधीचा व्यवहार उघडकीस 
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली आहेत. यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहारांची नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

पीडितांना तक्रारी नोंदवाव्यात
सावकार पीडित नागरिकांनी काही तक्रारी असतील तर गोपनीय पद्धतीने नोंदवाव्यात. त्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. - नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, जालना

Web Title: The sub-divisional squad's strike on the house of three lenders in Jalna district; Expose billions of transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.