"मी झोपेतून उठले तेव्हा मुलाचा मृत्यू झाला होता"; हत्येचा आरोप महिलेने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:56 AM2024-01-11T11:56:29+5:302024-01-11T12:13:02+5:30
ज्या अपार्टमेंटमध्ये ही महिला राहिली होती तिथे पोलिसांना कप सिरफच्या २ बाटल्या सापडल्या.
पणजी - आर्टिफिशियल इटेंलिजेंसच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेली ३९ वर्षीय सूचना सेठनं पोलीस चौकशीत तिने मुलाचा खून केल्याचं नाकारलं आहे. जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा मुलाचा मृत्यू झाला होता असा दावा तिने पोलिसांना केले आहे. मात्र अधिकारी तिच्या या दाव्याशी सहमत नाही. महिलेने मुलाची हत्या का केली याचा शोध घेतला आहे.
आतापर्यंतच्या तपासात आरोपी महिला आणि तिचा पती वेगवेगळे राहत होते. पतीच्या द्वेषाचा बदला तिने मुलावर काढला. पोलिसांनी मुलाची हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटकेत सूचना सेठला मनोचिकित्सा आणि ह्यूमन बिहेवियर सेंटरला घेऊन गेले आणि तिची सायक्लोजिकल चाचणी केली. सूचना सेठनं गोव्याच्या एका अपार्टमेंटमध्ये मुलाची हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगेत भरून टॅक्सीनं कर्नाटकच्या दिशेने जात होती. सोमवारी रात्री कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून तिला अटक करून गोव्याला आणले गेले. सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात असून तिने गुन्हा कबूल केला नाही.
ज्या अपार्टमेंटमध्ये ही महिला राहिली होती तिथे पोलिसांना कफ सिरफच्या २ बाटल्या सापडल्या. त्यातून मुलाला औषधांचा ओव्हर डोस दिल्याचे समोर येत आहे. ही नियोजितपणे केलेली हत्या आहे त्यामुळे महिलेची मानसिक स्थिती तपासण्यासाठी तिची सायक्लोजिकल चाचणी केली आहे. कुठल्यातरी वस्तूने गळा दाबून मुलाची हत्या केली असावी असं पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. पोलीस अपार्टमेंटमधील स्टाफशी चौकशी करत आहेत. या महिलेने ओषधाची एक बॉटल त्यांच्याकडून मागवली होती. मुलाच्या हत्येनंतर आरोपी महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. परंतु मी झोपेतून उठली तेव्हा मुलाचा मृत्यू झाला होता असं महिला सातत्याने सांगत आहे.
दरम्यान, महिलेचा पती आणि मुलाचे पिता हे इंडोनेशियामध्ये होते. मंगळवारी रात्री ते चित्रदुर्गला पोहचले. मुलाचा मृतदेह पोलिसांनी त्यांना सुपूर्द केला. आरोपी महिला आणि तिचा पती एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात आहे. आरोपी महिला हायप्रोफाईल असून ती एआय एथिक्स स्पेशालिस्ट आणि डेटा सायटिंस्ट आहे. गेल्या १२ वर्षापासून ती या फिल्डमध्ये काम करते.