अचानक खात्यात लाखो रुपये आले; लोकांनी बँकेत जायचे सोडून पोलीस ठाणे गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 10:34 PM2020-05-11T22:34:44+5:302020-05-11T22:38:15+5:30
राजस्थानातल्या तीन गावांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये अचानक २ ते ५ लाखांची रक्कम जमा होऊ लागली.
नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य गोष्टी उपलब्ध नाहीत. सर्व यंत्रणा ठप्प आहे. बँका सुरु असल्या तरी व्यवहारच नसल्याने पैशांची देवाणघेवाण देखील ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पैशांची खूप अडचण भासत आहे. त्यातच राजस्थानातल्या तीन गावांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये अचानक २ ते ५ लाखांची रक्कम जमा होऊ लागली. राजस्थान येथील भरतपुर जिल्ह्यातल्या चिकसानाची ही घटना आहे.
सुरूवातीला याबाबत कोणालाच काही माहिती नव्हती. मात्र, ३ गावांमध्ये खात्यात आलेल्या पैश्यांबाबत कुजबूज सुरू झाल्याने सगळ्या लोकांनी अखेर पोलीस ठाणं गाठलं आणि हा सायबर क्राईमचा प्रकार असल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितले. चिकसाना आणि नजीकच्या अन्य दोन गावांमध्ये नागरिकांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने पहिल्यांदा ते आनंदित झाले आणि नंतर ते घाबरून गेले. अचानक सगळ्यांना मोबाईलवर मेसेज येऊ लागल्याने लोकांना हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं कळालं. त्यानंतर संबंधित नागरिकांनी पोलीस ठाणं गाठलं आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला.
CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा
धक्कादायक! रिक्षाचालकाने गरोदर पत्नीची केली हत्या अन् गाठले पोलीस ठाणे
धक्कादायक! दफनभूमीवर दारु पिण्यास विरोध केला; तरुणाने जीव गमावला
त्यांच्या गावातल्या संदीप नावाच्या तरुणाने गावकऱ्यांकडून त्यांचे एटीएम कार्ड्स घेतल्याचं सांगितले. त्याने त्याच्या मित्राने नौदलात नोकरी लागण्यासाठी १० लाख रुपये एका व्यक्तीला दिले होते. तरीदेखील नोकरी लागली नाही. त्यातच त्याच्या बहिणीचं लग्न असल्याने त्याला ते पैसे परत घ्यायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे रोख रक्कम घेऊ शकत नव्हते. त्यामुळे त्याने शक्कल लढवून गावातल्या अनेकांकडून एटीएम कार्ड्स घेतली. तरुणाने तीन गावांमधील तब्बल ५४ लोकांकड़ून कार्ड घेत कुणालातरी गंडा घातला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. संदीप फरार असून पोलीस तपास करत आहेत. आपल्या बँकेचे डिटेल्स देताना सावध राहा असं आवाहन पोलिसांनी सगळ्यांना केलं आहे.