बँक फ्रॉड प्रकरणी सुधीर भटेवराला अटक; १३ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 04:07 AM2021-03-23T04:07:38+5:302021-03-23T05:56:45+5:30

न्यायालयाने भटेवरा याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्याचबरोबर अन्य १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.

Sudhir Bhatewar arrested in bank fraud case; 13 accused remanded in judicial custody | बँक फ्रॉड प्रकरणी सुधीर भटेवराला अटक; १३ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बँक फ्रॉड प्रकरणी सुधीर भटेवराला अटक; १३ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Next

पुणे : नामांकित बँकेमधील डारमेंट खात्याचा डेटा प्रकरणात सायबर पोलिसांनी पळून गेलेल्या सुधीर भटेवरा याला अटक केली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. सुधीर शांतीलाल भटेवरा (वय ५४, रा. एम्पायर सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अनघा मोडक तसेच औरंगाबाद येथील राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू हे सुधीर भटेवरा याच्या घरी १५ मार्च रोजी रात्री आले होते. शर्मा आणि संधू यांच्यासाठी भटेवरा याने २५ लाख रुपयांची सोय केली होती. 

पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन २५ लाख रुपये जप्त केले होते. या वेळी भटेवरा याला चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहण्याची ४१ नुसार नोटीस दिली होती. मात्र, तो पळून गेला होता. त्यामुळे सायबर पोलिसांनी रविवारी रात्री त्याला अटक केली.पोलिसांनी भटेवरा याच्याबरोबर इतर १३ आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले, भटेवरा याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. ते त्याने कोणाकडून आणले. त्याच्या मोबदल्यात त्याला इतर आरोपींकडून कोणता डेटा मिळणार होता.

राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू यांच्याशी त्याचा संपर्क कसा झाला, त्यांना मिळालेल्या बँक खात्यांचा डेटाचा ते पैसे काढण्यासाठी कसा उपयोग करणार होते, याचा तपास करायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने भटेवरा याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्याचबरोबर अन्य १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.

'हा सर्व क्लिष्ट तपास आहे'  
नामांकित बँकेतील डॉरमेट खात्यातील २१६ कोटी रुपयांचा डेटा मिळविणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबाद येथून अटक केलेले लक्ष्मीनारायण गुट्टू आणि व्यंकटेश उपाला यांना बँक खात्याचा डेटा कसा मिळाला. त्यांनी तो अनघा मोडक हिला कसा पाठविला. त्यांच्यात नेमका काय व्यवहार झाला. तसेच या डेटाचा वापर करून ते नेमके खात्यातील पैसे कसे काढून घेणार होते. हा सर्व क्लिष्ट तपास आहे. या खात्यांबाबत बँकांकडून माहिती आली आहे. ती पडताळून पाहून त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले. 

Web Title: Sudhir Bhatewar arrested in bank fraud case; 13 accused remanded in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.