मांत्रिक, वहिनी अन् लव्हस्टोरी...; दिरानं रहस्य उघड केलं अन् त्याचा जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:38 PM2023-10-16T12:38:30+5:302023-10-16T12:39:01+5:30

युवक बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला पाहून गावकऱ्यांनी या घटनेची माहिती कुटुंबाला दिला.

Suffering from Bhabi false allegations, brother-in-law commits suicide in Uttar Pradesh | मांत्रिक, वहिनी अन् लव्हस्टोरी...; दिरानं रहस्य उघड केलं अन् त्याचा जीव गेला

मांत्रिक, वहिनी अन् लव्हस्टोरी...; दिरानं रहस्य उघड केलं अन् त्याचा जीव गेला

उत्तर प्रदेशातील बांदा इथं एका युवकानं वहिनीच्या खोट्या आरोपांना कंटाळून आत्महत्या केली आहे. सूनेचे कुठल्या मांत्रिकांसोबत अफेअर सुरू होते. तो मांत्रिक कायम तिच्या घरी येत जात होता. कुटुंबाने या मांत्रिकाला घरी येण्यापासून रोखले होते. तरीही सून त्याला घरी बोलवायची असा आरोप युवकाच्या कुटुंबाने केला आहे. युवकाने महिलेला विरोध केला म्हणून तिने त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असंही कुटुंबाने म्हटले.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाने दावा केला की, आमच्या छोट्या मुलाने सूनेला विरोध केल्याने तिने एकदा नव्हे तर दोन-तीनवेळा बलात्काराची तक्रार पोलिसांना दिली. सूनेच्या खोट्या आरोपांना कंटाळून आमच्या मुलाने आत्महत्या केली असा आरोप कुटुंबाने केला. अतर्रा ठाणे परिसरातील ही घटना आहे. रविवारी याठिकाणी राहणाऱ्या एका युवकाने घरात मजुरी करण्याच्या बहाण्याने बाहेर पडला आणि बाहेर जाऊन विष प्यायले.

युवक बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला पाहून गावकऱ्यांनी या घटनेची माहिती कुटुंबाला दिला. कुटुंबाने युवकाला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले जिथे त्याचा मृत्यू झाला. प्रकरण जेव्हा पोलिसांकडे पोहचले तेव्हा कुटुंबाने सूनेवर आरोप केला. सूनेच्या छळामुळेच मुलाने आत्महत्या केली असा दावा त्यांनी केला. सून आणि मांत्रिक प्रियकर मुलाला त्रास देत होते. त्याच्यावर खोट्या बलात्काराचा गुन्हा दाखल करत होते. वारंवार पोलीस गुन्हे नोंद असल्याने युवक वैतागला होता. त्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असा आरोप कुटुंबाने केला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेत युवकाच्या वहिनीला अटक केली आहे. त्याचसोबत महिलेच्या मांत्रिक प्रियकराचा शोध घेतला जात आहे.

कशी सुरू झाली लव्ह स्टोरी?

कुटुंबाने सांगितले की, सूनेच्या पोटात गाठ होती, तिच्यावर मांत्रिकाने उपचार केले. त्यानंतर तो कायम घरी येत जात राहिला. अनेकदा हा मांत्रिक त्यांच्या घरीच थांबायचा. जेव्हा छोट्या मुलाने विरोध केला तेव्हा सूनेने भांडण केले. त्यानंतर दिराविरोधातच बलात्काराचा गुन्हा नोंदवला. मांत्रिकासोबत मिळून सून दिराला धमक्या देऊ लागली. त्यातून युवक मानसिक तणावाखाली गेला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेला अटक केली असून तिचा जबाब नोंदवला जात आहे. तर फरार मांत्रिकाचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Suffering from Bhabi false allegations, brother-in-law commits suicide in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.