ऑनलाईन क्लासच्या तणावातून आठवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:54 PM2020-06-25T12:54:28+5:302020-06-25T12:57:15+5:30

मुलीच्या आईने तिला शाळेने दिलेला अभ्यास पूर्ण करण्यास सांगितले. त्यावेळी मुलगी आंघोळ करायची आहे असे सांगून खोलीत निघून गेली.

Suicide of 12 year old student over stress of online classes, homework | ऑनलाईन क्लासच्या तणावातून आठवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

ऑनलाईन क्लासच्या तणावातून आठवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देमुलीच्या आईने तिला अभ्यास करण्यासाठी सांगितल्यानंतर तिने आंघोळ करण्याचं कारण सांगून खोलीत गेली आणि गळफास लावून घेतला.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन क्लास विद्यार्थ्यांना आवश्यक असल्याने मुलीच्या वडिलांनी १० हजारांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता.

राजकोट - गुजरातमधील राजकोट येथे आठवीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या ऑनलाइन क्लास आणि होमवर्कच्या तणावातून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या मुलीच्या वडिलांचे गॅरेज असून त्यांनी तिला ऑनलाईन अभ्यासासाठी १० हजार रुपयांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता. मुलीच्या आईने तिला अभ्यास करण्यासाठी सांगितल्यानंतर तिने आंघोळ करण्याचं कारण सांगून खोलीत गेली आणि गळफास लावून घेतला.

अहमदाबाद मिररने दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय विद्यार्थिनी ऑनलाईन क्लास, दिला जाणारा होमवर्क याला वैतागलेली होती. तसेच शाळेतील मित्र - मैत्रिणींना भेटता येत नसल्याने भावनिक तणाव देखील असल्याचे तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.बराच वेळ उलटला तरी मुलगी खोलीबाहेर आली नाही. म्हणून तिची आई खोलीत गेली. त्यावेळी तेथे मुलगी लटकलेल्या स्थितीत आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

मृत मुलीचा लहान भाऊ आणि ती गुजराती माध्यमात शिकत होते. लॉकडाऊनमुळे मुलीला आठवीच्या वर्गात प्रमोट करण्यात आले होते. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन क्लास विद्यार्थ्यांना आवश्यक असल्याने मुलीच्या वडिलांनी १० हजारांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या पालकांकडे विजेचे बिल भरायला देखील पैसे नाहीत. त्यांच्या कुटुंबात पहिल्यांदा स्मार्टफोन खरेदी करण्यात आला होता. घरात सर्वात स्वस्त मोबाईल वापरला जात आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ

 

Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

Web Title: Suicide of 12 year old student over stress of online classes, homework

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.