सावकाराच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या : दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:54 PM2020-07-16T15:54:43+5:302020-07-16T15:58:10+5:30

या तक्रारीवरून संतोष गुरव या सावकारासह मध्यस्थी करणाऱ्या सुजय दळवी या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Suicide after getting fed up with moneylender threats: Charges filed against both | सावकाराच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या : दोघांवर गुन्हा दाखल

सावकाराच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या : दोघांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे खंबाळपाडा परिसरात राहणा-या मंदारने मुलुंड येथे राहणा-या गुरव या सावकाराकडून व्याजाने कर्ज घेतले होते. हे सर्व प्रकरण जून 2018 ते मार्च 2020 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

डोंबिवली:  सावकाराच्या धमक्यांना कंटाळून मंदार वेरलकर याने आत्महत्या केल्याची तक्रार त्याची आई आरती हिने टिळकनगर पोलिस ठाण्यात केली आहे. या तक्रारीवरून संतोष गुरव या सावकारासह मध्यस्थी करणाऱ्या सुजय दळवी या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.


खंबाळपाडा परिसरात राहणा-या मंदारने मुलुंड येथे राहणा-या गुरव या सावकाराकडून व्याजाने कर्ज घेतले होते. यात खंबाळपाडा परिसरात राहणा-या दळवीने मध्यस्थी केली होती. दरम्यान मंदारने घेतलेले कर्ज फेडले असतानाही व्याजाचे आणखीन 15 लाख रूपये दे असा तगादा लावून गुरव आणि दळवी यांच्याकडून वारंवार धमकी दिली जात होती. या धमक्यांना कंटाळून मंदारने रहात्या घरी आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या आईने आरती यांनी केला आहे. हे सर्व प्रकरण जून 2018 ते मार्च 2020 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

 

Powered By PLAYSTREAM

सदर चित्रपटाचे प्रसारण २१ जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात येणार आहे,  परंतु त्यावर बंदी घालावी असे विनंतीपत्र  रजा अकादमीने राज्याच्या सायबर विभागास पाठविले होते.  त्यास अनुसरून केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाला पत्र पाठवून या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारणावर बंदी घालावी तसेच यु ट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्स अँप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला सदर चित्रपट प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी पत्रात केली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने देखील अशा प्रकारची विनंती सदर मंत्रालयाला केली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता हे बंदी घालण्यासाठीचे विनंतीपत्र दिले असल्याची माहिती  देशमुख यांनी दिली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लॉकडाऊनमध्ये नोकरीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार; पीडितेला घरात डांबून ठेवलं

 

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 

ताई मला वाचव!  हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...

 

हत्येनंतर चोराने बलात्कार केला; विवस्त्र मृतदेहाला फ्रिजमध्ये ठेवायचा प्रयत्न फसला

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

 

Web Title: Suicide after getting fed up with moneylender threats: Charges filed against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.