रावेतमध्ये दोघांची विष प्राशन करुन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 10:57 IST2018-11-23T10:56:47+5:302018-11-23T10:57:41+5:30
या जोडप्याने अनैतिक संबधातून विष प्राशन करुन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

रावेतमध्ये दोघांची विष प्राशन करुन आत्महत्या
देहुरोड: रावेत येथील एका रिसोर्टजवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका वाहनात गुरूवारी (दि.२२) रात्री आठच्या सुमारास एका महिलेसह पुरूष इसम असे दोघांचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरूवारी ( दि.२२) रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेहांची ओळख पटली असून अनैतिक संबंधातून या आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वतर्विला आहे.
अनुपमा करांडे (वय ४१ रा. वाकड, पुणे ) आणि अमोल शितोळे ( वय ३० रा. कासारसाई, मुळशी जि पुणे ) असे मयतांची नावे आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने अनैतिक संबधातून विष प्राशन करुन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहे.