लोअर परळ येथे व्यावसायिकाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 20:20 IST2019-10-04T20:16:59+5:302019-10-04T20:20:38+5:30
याप्रकरणी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोअर परळ येथे व्यावसायिकाने केली आत्महत्या
मुंबई - लोअर परळ येथील युनिटी टॉवरच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून एका कापड व्यावसायिकाने आज आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. रमेश मोहनलाल जैन (५१) असं आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास युनिटी टॉवरच्या ७ व्या मजल्यावरून रमेश जैन यांनी उडी मारली. याच टॉवरमध्ये रमेश हे राहत होते. ना. म. जोशी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी अवस्थेत रमेश यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दाखलपुर्व त्यांना मृत घोषित केले. रमेश यांचा कपड्याचे दुकान असून ते व्यावसायिक आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी सुसाईट नोट अथवा आत्महत्येबाबत पुरावा सापडला नसून पोलीस तपास करत असल्याची माहिती ना.म. जोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.
मुंबई - लोअर परळ येथील युनिटी टॉवरच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून रमेश जैन यांनी केली आत्महत्या https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 4, 2019